ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांवगी मेघे पोलीसांकडुन गौण खनीज (रेती)चे अवैधरीत्या उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 02/09/2026 रोजी सावंगी मेघे येथील पोलीस पथक पो स्टेला हजर असताना मुखबीर कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, एका ट्रॅक्टरमध्ये काळी रेती भरून मौजा पडेगाव जवळील भदाडी नदीचे बाजचे पांघन रस्त्याने रेतीची अवैधरीत्या वाहतूक करीत आहे, अशा माहितीवरून पोलीस पथक भदाडी नदीचे पांघर रस्त्यावर पंचासह पोहचून नाकेबंदी करीत असता काही वेळातच एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर भदाडी नदीचे पात्राकडुन पडेगाव कडे येताना दिसला, सदर ट्रॅक्टर यास थांबवून ट्रॅक्टर चालकास आम्ही त्याचे नाव पत्ता विचारून सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये अर्घा ब्रास (50 फुट) काळी ओलसर रेती दिसून आली, त्यास पासपरवाना विचारला असता त्याचेजवळ कुठलाही पासपरवाना नसून ट्रॅक्टर मालक याचे सांगण्यावरून मी रेतीची बिना पासपरवाना वाहतूक करतो असे सांगीतल्याने आरोपी ट्रॅक्टर चाालकचे ताब्यातून 1) एक निळ्या रंगाचा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर क. एम. एच. 32 ए.सी. 5195 व बिना नंबर प्लेटची ट्रॉली किं. 7,00,000/ रू. 2) अर्घा ब्रास (50 फुट) काळी ओलसर रेती किं. 3,500/ रू. असा एकुण जु.किं. 7,03,500/ रू. चा मुद्देमाल शासनाचा महसुल चुकवुन रेतीची (गौणखनीज) अवैद्यरित्या बिना पासपरवाना रेतीची चोरी करून वाहतूक करताना मिळुन आल्याने आरोपी ट्रॅक्टरचा चालक आरोपी नामे 1) लक्ष्मण गणेशराव पेटकर वय 33 वर्ष रा. पडेगाव, ता.जि. वर्धा. व ट्रॅक्टर मालक 2) राजेन्द्र तडस रा. पडेगाव ता.जि. वर्धा यांचे विरूध्द पो.स्टे. ला अप. क. 702/2026 कलम कलम 303 (2), 3(5) बि.एन.एस. सहकलम 48(8) जमिन महसुल अधि. सहकलम 3(1), 130, 177, 181, मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडीक साहेब, यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री विनोद गिरी सा, ठाणेदार, पो.स्टे. सांवगी, व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, कॉन्स्टेबल निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, यांनी केली. पुढील तपास पोहवा विरेन्द्र कांबळे, हे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये