स्टोन कशर मशिनचे बेरींग चोरी करणाऱ्या आरोपींचा सावंगी मेघे पोलीसांनी 2 तासांचे आत शोध घेवून केली अटकेची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी नामे अशोक श्रीराम तेलंग रा. येळाकेळी, यांनी रिपोर्ट दिला की दि. 31/08/2026 चे 19/00 वा ते 19/30 वा. दरम्यान फिर्यादी यांचे मौजा येळाकेळी येथे खदानीवरील 1) स्टोन कशर मशिनला लागणारे दोन लोखंडी व पितळी बेरींग किं. 80,000/रू. 2) पोकलॅन मशिनच्या इंजिनचा लोखंडी पत्रा किं. 10,000/रू. असा एकुण जु.किं. 90,000/रू. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. अशा तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे.ला अप.क. 701/2026 कलम 303 (2), 3(5) बी.एन.एस. प्रमाणे नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पो.नि. विनोद गिरी सा. ठाणेदार पो.स्टे. सावंगी यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना मार्गदर्शन करून गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल व अज्ञात आरोपीचे शोधकामी रवाना केले असता मुखबीरकडून मिळालेल्या माहितीवरून 1) प्रविण समाधान इंगळे वय 29 वर्ष रा. येळाकेळी, 2) नयन महिपालसिंग बंडवाल वय 29 वर्ष रा. खेरडा यांना ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची दोन पंचासमक्ष कबूली दिली असून गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल खदानीच्या टेकडीजवळच लपवून ठेवलेला आहे असे सांगीतल्याने त्यांचे ताब्यातून 1) स्टोन कशर मशिनला लागणारे दोन लोखंडी व पितळी बेरींग किं. 80,000/रू. 2) पोकलेंन मशिनच्या इंजिनचा लोखंडी पत्रा किं. 10,000/ रू. असा एकुण जु.किं. 90,000/रू. चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडीक साहेब, यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री विनोद गिरी सा, ठाणेदार, पो.स्टे. सांवगी, व पोलीस स्टाफ पोउपनि, गोपाल शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव यांनी केली असून पुढील तपास संजय पंचभाई, हे करीत आहेत.



