ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उघड झालेल्या गुन्ह्यांतील हस्तगत ऐवज फिर्यादींना सुपूर्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०१/०९/२०२६ रोजी श्री संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र, नागपूर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे अधिकृत भेट दिली.

आगामी सण-उत्सवांच्या तयारीचा आढावा व मार्गदर्शक सूचना

या भेटीदरम्यान आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री सौरभ अग्रवाल यांनी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) साहेबांना आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने केलेल्या सुरक्षेच्या पूर्वतयारीबाबत व नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

या भेटीदरम्यान मा. आयजी सरांनी वर्धा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः आगामी पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गणेशोत्सव या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व सण-उत्सव शांततेत, सौहार्दाच्या वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्वतयारी करावी, तसेच असामाजिक घटकांवर कडक नजर ठेवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक कारवाया कराव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी या प्रसंगी अधिकाऱ्यांना दिल्या. उघड

झालेल्या गुन्ह्यांतील माल फिर्यादींना सुपूर्द:

बाच भेटीच्या दरम्यान, वर्धा जिल्हा पोलीस दलाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत उघडकीस आणलेल्या चोरीच्या गुन्ह्यांतील हस्तगत केलेला मौल्यवान माल मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते मूळ फिर्यादींना सन्मानाने सुपूर्त करण्यात आला. परत करण्यात आलेल्या मालाचा व गुन्ह्यांचा सविस्तर तपशीलः

पोलीस स्टेशन रामनगरः अपराध क्रमांक व कलमः ४९७/२०२६, कलम ३०५, ३३१ (४) बी. एन. एस. च्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले ६.८ किलो चांदीचे दागिने फिर्यादी श्री संजय भगवान उदावंत यांना परत केले.

पोलीस स्टेशन वर्धा शहरः अपराध क्रमांक व कलमः २६६/०१, कलम ३८० भा.दं. वि. च्या गुन्ह्यातील फिर्यादी सौ. रेणुका प्रकाश तळवेकर यांच्यातर्फे प्रकाश तळवेकर यांना चांदीच्या पायपट्टया ४० ग्रॅम परत केल्या

पोलीस स्टेशन वर्धा शहरः अपराध क्रमांक व कलमः ५०/९८, कलम ४५४, ३८०, ४५७ भा.दं. वि. च्या गुन्ह्यात फिर्यादी श्री विजय शामराव उमरे यांच्यातर्फे दीपक उमरे यांना चांदीच्या वस्तू ६० ग्रॅम परत केल्या.

पोलीस स्टेशन वर्धा शहरः अपराध क्रमांक व कलमः ३३६/०१, कलम ४९८(३), ३४ भा.दं.वि. च्या गुन्ह्यात फिर्यादी सौ. निर्मला शंकरराव निरगुड यांच्यातर्फे निरगुड यांना चोरट्यांकडून हस्तगत केलेले ४ पिवळ्या धातूचे मणी परत केले.

पोलीस स्टेशन वर्धा शहरः अपराध क्रमांक व कलमः २६१/९९, कलम ३०४ अ.भा.दं.वि. च्या गुन्ह्यात फिर्यादी अभिजित नानाजी मिसाळ यांचे चोरीस गेलेले १६ पिवळ्या धातूच्या (सोन्याच्या) बोरमाळी व वाट्या गोप चोरट्यांकडून हस्तगत करून फिर्यादीना परत केले.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी वर्धा पोलीस नेहमीच तत्पर असून, आगामी सण-उत्सवांच्या काळात सर्वांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन या प्रसंगी प्रशासनामार्फत करण्यात आले.

वा बैठकीस व माल वाटप कार्यक्रमास पोलीस अधीक्षक वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे तसेच वर्धा जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शाखा प्रमुख उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये