भुर्णा तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका; 50 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. तालुक्यातील सुमारे 50 कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशा प्रकारचे पक्षांतर राज्यातील अनेक भागांतही अलीकडे पाहायला मिळत आहे.
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे आणि सततच्या जाचाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पक्षात सामान्य कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले असून, पोंभुर्णा तालुक्यातील शिवसेनेच्या राजकारणात याचे परिणाम दिसू शकतात.



