ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी उत्पादक नव्हे उद्योजक होण्याची संधी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी _ मा. देवराव भोंगळे आमदार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

जागतीक बॅकेच्या अर्थ सहायीत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत मा. बाळा साहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीन परीवर्तन स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत वनसडी या आदिवासी क्षेत्रातील पंचकुशीतील 1235 सभासद एकत्र येउन सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली व वनसडी येथे 2.85 लक्ष किंमतीचे 1080 मॅट्रीक टन क्षमतेचे धान्य साठवणुक गोदाम तेल बिया कार्यक्रमा अंतर्गत साठवणुक गोदाम क्लिनींग ग्रेडींग यंत्र दाल मिल व आटा पिसाई प्रकल्पाचे यंत्र पुजंन व उदधाटन समांरभात आमदार भोगळे म्हणाले शेकतरी संघटीत होउन अशा प्रकल्प उभारणी मुळे शेतकऱ्याना आर्थिक बळ त्या बरोबर व्यवसाय दृष्टोकोणातुन सेवा मार्गदर्शन व धान्यचे साठवणुक करुन तांराण पध्दतीने पळत्याभावात धान्य विक्रीला आळा बसुन चढत्या भावाचत विक्रीतुन लाभ शेतकऱ्याचा पदरात येतो वनसडी सारख्या आदिवासी भागात येउन सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीने साठवणुक गोदाम दर्जेदार धान्य तयार करण्यासाठी ल्किनिंग ग्रेडीन प्रक्रिया उदयोग अवजारे बॅक महा-ई सेवा, माती परीक्षण अशा सुविधा उपलब्ध करुन दिलेला आहे याचा लाभ शेतकरी व सभासदानी घेउन शेतकरी हा फक्त उत्पादन घेणारा नव्हे तर उदयोजग म्हणुन पुढे येण्याची संधी शेकतरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातुन उपलब्ध झाली आहे. हे आठवडी बाजारचे ठिकाण असुन शेतकरी उत्पादीत वस्तु विक्री सुविधा केंन्द्र 8 खोलीचे शेतकरी बाजार निर्माण करण्यांसाठी खनीज विकास निधी अंतर्गत उभारणी करण्याचा सकारात्मक पाठपुरावा करुन असे म्हणत प्रस्तावीत मध्ये आबिद भाई यांनी जिल्हाभऱ्यातील शेतकरी उत्पादक कंपनी प्रकल्प उभारणीमध्ये अनेक अडचणी समस्या येत असल्याने या सर्व समस्या सोडवण्साठी तसेच पोकरा 2 अंतर्गत 6 हजार कोटीचा महत्वकांक्षी प्रकल्प नव्याने टाकलेल्या अटीमुळे हा प्रकल्प सुलभतेने राबवणे शक्य नाही तसेच खनीज विकास निधीमध्ये व्यपक भरीव निधी शेतकऱ्यासाठी तरतुद करण्यात यावी अशी मागणी आपण केली या बाबत मंत्रालयात बैठक लावुन प्रश्न मार्गी लावु अशी ग्वाही आमदार भोगळे यांनी दिली यावेळी श्री. शंकर तोटावार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेवुन शेतमध्ये समृध्दी आनावी व शेतकऱ्यानी लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे मत व्यक्त केले. तसेच आत्माचे प्रकल्प संचालक अरुण कुसळकर यांनी स्मार्ट प्रकल्प

अंतर्गत जिल्हामध्ये शेतकरी सभासद यांच्या एकजुटीमुळे व शेतकरी उत्पादक संचालक यांच्या प्रयत्नातुन जिनिग प्रेसिंग क्लिनीग ग्रेडींग प्रक्रीया उदयोद दाल मील ऑईल मील, धान गिरणीख्‍ उभ्या झाल्या यामुळे हजारो शेतकरऱ्या लाभ होणार आहे. अशी माहीती देवुन सभासदानी आत्मा अंतर्गत शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्याचे आव्हाण केले. शेकडो शेतकरी व सभासदाच्या उपस्थीत उदघाटन सोहळा वृक्ष लागवड वेज ब्रिजचे भुमी पुजन तसेच मशीनरीचा स्वीच दाभुन चालु करण्यांत आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास जाधव, श्री. श्रीकांत बोबड गटविकास अधिकारी, श्री. प्रफुल ठाकरे कृषी अधिकारी चंद्रपुर, गोविंद ठाकुर तालुका कृषी अधिकारी, श्री. गणेश मादेवार, गडचांदुर नगर परीषदेचे नगर अध्यक्ष श्री. निलेश ताजणे, स्मार्ट साठवणुक वाघ कंपनीचे नविन कुमार, संदीप व्यकंट, सरपंच मंगला आत्राम, उप सरपंच ईरफान शेख जिल्हातील शेतकरी उत्पादक कंपनीचे नरेन्द्रजी जिवतोडे, नामदेवजी डाउले, लक्ष्मणराव गुघुल, संतोष खरडकर, गणेश वाभिडकर, सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक शंकर ठावरी, अजर शेख, शुभम थिपे, सोहेल अली, सविता खापणे, यांचेसह शेकडो सभासद व शेतकरी उपस्थीत होते. संचलन प्राध्यपक श्री. संजय ठावरी सर यांनी केले व आभार सोहेल अली यानी मानले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये