आमदार मनोज कायंदे यांच्या आश्वासनानंतर त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण घेतले मागे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा नगर परिषदेच्या आस्थापनेवरील नप ने नियुक्त केलेले कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे सेवा निवृत्त नंतर त्या कर्मचाऱ्यास जे आर्थिक लाभ देय असतात त्यामध्ये उपदानाची रक्कम व रजा रोखीकरणाची रक्कम ही देण्याची जबाबदारी नगरपरिषदची असते मात्र आर्थिक कारण सांगत अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही सेवानिवृत्तीनंतरचे लाभ न मिळाल्याने दिनांक 15 ऑगस्ट 26 रोजी सेवानिवृत्त कर्मचारी बी.एम. भगत व रा.ब. गोरे यांनी नगरपरिषद समोर आमरण उपोषणास सुरुवात केली त्यांच्या उपोषणाची नगर परिषद चे अध्यक्ष माधुरी शिपणे यांनी दखल घेत या विभागाचे आमदार मनोज कायंदे यांना याबाबत सविस्तर माहिती दिली असता त्यांनी तात्काळ याबाबत संबंधित विभागाने निधी प्राप्त साठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले व उपोषणकर्त्याची अध्यक्षांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
याबाबत सविस्तर असे की राज्यातील सर्वच नगरपरिषद च्या आस्थापनेवरील न.प. ने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर जे आर्थिक लाभ देय असतात त्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग व नगरपरिषद प्रशासन संचालनालया कडून कोणत्याही प्रकारचे अनुदान देय नाही मात्र या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे उपदानाची रक्कम व रजा रजा करणाची रक्कम ही नगरपरिषद प्रशासनाने देण्याबाबत दिनांक नऊ सहा 2016 रोजी पत्र क्रमांक 35/ कक्ष.7/ 8429 अन्वये स्पष्ट आदेश निर्गमित केलेले असून यामध्ये नमूद केले आहे की राज्य शासनाकडून नगरपरिषदांना देण्यात येणारे विविध अनुदान मुद्रांक शुल्क,गौण खनिज, बिगर शेतीसारा, करमणूक कर तसेच घरपट्टीच्या प्राप्त वसूल पैकी 20% रकमेचा वापर केवळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा अदा करण्यासाठी वापरण्यात याव्यात तर दिनांक 31 मे 2002 रोजी पत्र क्रमांक नपसू/ 2002 प्र.क्र.105/ 2002 अन्वये नको प्रशासनाला स्थाई निर्देश करण्यात आलेले आहेत की उपदानाचे प्रदान ते देय झाल्याचे तारखेपासून तीन महिन्यानंतर प्राधिकृत करण्यात येऊन रक्कम प्रदान करण्यास प्रशासकीय चूक कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाले तर उपदानाच्या रकमेवर तीन महिन्यानंतरच्या कालावधीसाठी व्याज देण्यात यावे मात्र या स्थायी निर्देशानंतरही न.प. ने व्याज तर सोडाच मूळ उपदानाची रक्कम सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांना अदा केलेली नाही.
यासाठी दिनांक 15 ऑगस्ट 26 रोजी न.प.समोर उपदानाची रक्कम व रजा रोखी करनाची रक्कम व्याजासहित मिळण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी बी.एम.भगत व रा.ब.गोरे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती या उपोषणाची न.प.चे अध्यक्ष माधुरी शिपणे व माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांनी दखल घेत आमदार मनोज कायंदे.यांच्या मदतीने उपोषणाची सांगता केली याप्रसंगी शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आमदार यांनी यंत्रणा प्रमुखांना दिलेल्या आहेत यावेळी संतोष खांडेभराड धनशिराम शिपणे, प्रदीप वाघ, गोविंद तिडके, शौकत भाई, दिलीप झोटे, सुनिल शेजुळकर आदर्श गुप्ता तुषार शिपणे उपस्थित होते.



