शरदराव पवार महाविद्यालय व अल्ट्राटेक सिमेंट माणिकगड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदुर :- स्थानीक शरदराव पवार महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अल्ट्राटेक सिमेंट माणिकगड युनिट गडचांदुर येथील क्लब हाऊस परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे महत्त्व आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. संजय गोरे अल्ट्राटेक सिमेंट गडचांदुर चे नवीन कौशिक इ .आर .हेड, एम.शंकर एच. आर. हेड , महाविद्यालयाचे रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. शरद बेलोरकर, डॉ. सतेंदर सिंग,सच्चिदानंद शुक्ला, नितीन नगराळे. शांतनू आकाश, सचिन गोवारदिपे, संगीत चांदेकर, सोनाली ठाकोरे, मानस, बेहरा, सौरभ गौतम, विजय सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट करताना मान्यवरांनी “वृक्ष हेच जीवनाचे आधार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे,” असे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात परिसरात करण्यात आली. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थी व समाजामध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अल्ट्राट सिमेंट माणिकगड गडचांदूर पर्यावरण विभाग यांच्या वतीने करण्यात आले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,अल्ट्राटेक सिमेंट माणिकगड चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले



