घुग्घुसमध्ये नगरसेवक विवेक बोढे यांच्याकडून कावड यात्रेचे स्वागत

चांदा ब्लास्ट
शहरात १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता बसस्थानक चौक येथे नगरसेवक विवेक बोढे यांच्या वतीने कावड यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. बोल बम समिती, घुग्घुस यांच्या वतीने वर्धा नदीच्या त्रिवेणी संगमातून जल घेऊन पायी कावड यात्रा काढण्यात आली होती.
कावड यात्रा घुग्घुस बसस्थानक चौकात पोहोचताच नगरसेवक विवेक बोढे यांनी यात्रेत सहभागी भाविकांचे भगवा दुपट्टा परिधान करून स्वागत केले. यावेळी भाविकांना पाण्याच्या बाटल्या, फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
कावड यात्रेचा समारोप वणी तालुक्यातील शिरपूर येथे करण्यात आला. यावेळी नगरसेवक विवेक बोढे यांच्यासह भाजपचे गणेश कुटेमाटे, वसंता भोंगळे, सुरेंद्र भोंगळे, सुनील राम, सुनील श्रीवास, जयराज घोरपडे, संजय मानकर, शरीफ सिद्दीकी, तुळसीदास ढवस, रंगय्या पुरेल्ली, सचिन नांदे, अनिल गुप्ता, सुनंदा लिहीतकर, हनुमान खडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कावड यात्रेदरम्यान भाविकांमध्ये मोठा उत्साह आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळाले.



