ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी महाविद्यालय येथे एड्स जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे

गडचांदूर :- महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शैलेंद्र डी. देव होते. तर डॉ. अजय कुमार शर्मा हे प्रमुख पाहुणे, तर ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथील आरोग्य सेवा विभागाचे श्री. राजेश उलमले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. श्री. उलमले यांनी विद्यार्थ्यांना HIV/AIDS, त्याचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गैरसमज याबाबत मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. शैलेंद्र डी. देव व प्रमुख पाहुणे डॉ. अजय कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्याचे आणि HIV/AIDS बाधित व्यक्तींशी भेदभाव न करता मानवतेच्या भावनेने वागण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन श्री. चेतन वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेवटी श्री. वानखेडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये