ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेणगावात ‘वेगळ्या विदर्भा’साठी रास्ता रोको आंदोलन

ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- शेणगाव येथे ३० डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती,शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष तालुका जिवती च्या वतीने स्थानिक बसस्थानक चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी २७ डिसेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते,माजी आमदार ॲड.वामनराव चटप, देशौन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, आणि सहकारी यांचे आमरण उपोषण सुरू आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख सय्यद शब्बीर जागीरदार, स्वतंत्र भारत पक्षाचे देवीदास वारे, उपसरपंच नरसिंग हामणे, रामेश्वर नामपल्ले, सरपंच भिमराव आत्राम, उध्दव गोतावळे, लहु भुते, प्रकाश शिंदे, शेषराव खंदारे,न्यानेश्वर वारे, बालाजी नरोटे, अशोक तांबरे, अंकुश देवकते, शिवाजी माने, शादुल सय्यद,अबुतुराब जागीरदार, तुकाराम सिडाम, अंगत तांबोळे, मारोती रंभाजी, गजानन वारे,न्यानु खंदारे, फिरोज पठाण,बेलाळे मामा, संजय रावनकोळे, माधव वारे, श्रिराम सानप यांच्यासह शेतकरी संघटना,स्वतंत्र भारत पक्षाचे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विदर्भप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जगताप यांचा पोलीस बंदोबस्त होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये