ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोफत शस्त्रक्रिया करिता रुग्णांची पहिली तुकडी रवाना

शालिनीताई मेघे रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया ; गोंडपिपरीतील आरोग्य शिबिराचे फलित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून गोंडपिपरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील तब्बल १०१२ नागरीकांनी या आरोग्य सेवेचा प्रत्यक्ष लाभ घेतला.

शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांपैकी ३०९ रुग्ण पुढील मोफत शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. शिबीरात पात्र ठरलेल्या रुग्णांवर टप्प्याटप्प्याने तुकडीनिहाय नागपुरात शस्त्रक्रिया पार पडणार आहेत. त्यापैकी रुग्णांची पहिली तुकडी आज गुरुवारला ( दि.२३) गोंडपिपरी येथील तालुका भाजपा कार्यालयातून शालिनीताई मेघे रुग्णालय वानाडोंगरी करिता रवाना करण्यात आली. शस्त्रक्रियेकरिता रवाना झालेल्या रुग्णांमध्ये मोतीबिंदू, हरनिया, अस्थिरोग, शरीरावरील गाठी, आदी आजार असलेल्या रुग्णांचा समावेश होता.

आज रवाना झालेल्या ट्रॅव्हल्सला भाजपाचे महामंत्री निलेश पुलगमकर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजयुमो तालुकाध्यक्ष राकेश पूण, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, जिल्हा महिला महामंत्री कोमल फरकडे, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, नगरसेविका सारिका मडावी, शारदा गरपल्लीवार, शिथिल लोणारे, रमेश दिनगलवार, पंकज चिलनकर यांचेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये