ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दरूर उपसा सिंचन प्रकल्पाची आमदार देवराव भोंगळे यांच्याकडून पाहणी

शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी प्रभावी नियोजनाचे अधिकाऱ्यांना निर्देश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील मौजा किरमिरी गावाजवळील दरूर उपसा सिंचन प्रकल्पाला आमदार देवराव भोंगळे यांनी भेट देत प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंप हाऊस, पाईपलाइन तसेच अन्य पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

धरणातील उपलब्ध पाण्याचा पुरेपूर व प्रभावी वापर करून परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना आमदार भोंगळे यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता जी. आय. सिंह, सहाय्यक अभियंता एच. जी. लांडे, अभियांत्रिकी सहाय्यक पी. एम. उईके, भाजयुमो तालुकाध्यक्ष राकेश पून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धूडसे, स्वप्निल अनमूलवार, स्वप्निल झाडे, बाळू ताजणे, कृपाल आत्राम, मोहन विरुटकर, दिवाकर आक्केवार, साईनाथ फुलमारे, सोनल कांबळे, धर्मराव आडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये