ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोंडपिपरी येथे महाआरोग्य  व मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

१०१२ नागरीकांनी घेतला लाभ; _३०९ रुग्ण शस्त्रक्रियेस पात्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि नवमहाराष्ट्राचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजुरा विधानसभा मतदारसंघात ‘देवाभाऊ सेवा सप्ताह’ अत्यंत उत्साहात आणि सेवाभावाने साजरा केला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून गोंडपिपरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल १०१२ नागरीकांनी या आरोग्य सेवेचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे अनेकदा वेळेवर वैद्यकीय उपचार किंवा महागड्या शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. हीच गरज ओळखून आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘देवाभाऊ सेवा सप्ताहांतर्गत’ साजरा करत हे भव्य शिबिर आयोजित केले. वाणाडोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार व योग्य वैद्यकीय सल्ला दिला. शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांपैकी ३०९ रुग्ण पुढील मोफत शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत, ज्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिबीरात पात्र ठरलेल्या रुग्णांवर टप्प्याटप्प्याने तुकडीनिहाय नागपुरात शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.

या महाआरोग्य शिबिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ‘कॅन्सर व्हॅन’च्या माध्यमातून रुग्णांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली, तर दंत महाविद्यालयाच्या पथकाने शिबिरार्थींवर प्रत्यक्ष दंतोपचार केले. याशिवाय, शिबिरस्थळीच हजारो रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते गरजू रुग्णांना जागीच मोफत चष्मेवाटप ही करण्यात आले. आरोग्य तपासणीसोबतच सर्वसमावेशक सेवा मिळाल्याने नागरिकांनी या उपक्रमाबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिर्घार्युरोग्याची प्रार्थना करत त्यांच्या सेवाकार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “आदरणीय देवेंद्रजी हे खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच राज्यात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’ सुरू झाला, ज्याचा फायदा आज राज्यातील लाखो निराधार आणि गरजू रुग्णांना होत आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवून आणि शेतकऱ्यांसाठी ७.५० HP पर्यंतची वीजबिल माफी देऊन सर्वसामान्यांना मोठा आधार दिला आहे. अशा जनहितकारी नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व समाजसेवेचे कार्य करणे, हीच त्यांना दिलेली खऱ्या अर्थाने सार्थ शुभेच्छा ठरेल.”

या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास बीआयटीचे अध्यक्ष संजय वासाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, भाजप जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार,  शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, शालीनीताई मेघे हॉस्पिटलचे डॉ.आश्विन रडके, डॉ. संजय गुप्ता, प्रा. जांभूळकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पून, महामंत्री निलेश पुलगमकर, सतीश वासमवार, बाजार समिती सभापती इंद्रपाल धुडसे, उपसभापती स्वप्नील अनमूलवार, जिल्हा महिला मोर्चा महामंत्री कोमल फरकाडे, सुहास माडुरवार, शिथिल लोणारे, गणेश मेरुगवार, वैभव बोनगिरवार, राकेश साखलवार, स्वाती वडपल्लीवार, वैष्णवी बोडलावार, अरूणा जांभुळकर, शारदा गरपल्लीवार, रंजना रामगीरकर, सुरेखा श्रीकोंडावार, माया वाघाडे, शुभांगी वनकर, कलावती पुप्पलवार, सुरेखा पिपरे, पायल देवतळे, भारती साखलवार, संजय येलमुले, मारोती अम्मावार, संजना अम्मावार, अस्मिता रापलवार, गणेश डहाळे, प्रवीण धोडरे, मनोज वनकर, प्रज्वल बोबाटे, पंकज चिलनकर, हरीश घोगरे, नितेश तुमडे, यांचेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गोंडपिपरी परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये