वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रुग्णांना फळांचे वाटप
माणुसकीची हाक फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा, प्रतिनिधी : माणुसकीची हाक फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शेंडे यांनी आपला वाढदिवस समाजसेवेच्या माध्यमातून साजरा करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. यानिमित्त जि. प. उच्च प्राथमिक शाळा, आंबेधानोरा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तर ग्रामीण रुग्णालय, पोंभुर्णा येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
माणुसकीची हाक फाउंडेशनतर्फे दरवर्षी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता व आपुलकी व्यक्त करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.
आंबेधानोरा येथील शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक वेलादी सर, साखलवार सर, वासलवार सर तसेच चंद्रकांत सिडाम, प्रतिप कोडापे, सुरज बेताल, रितिक मेश्राम, भूषण इप्पलवार, रोहित आदे आणि ओमप्रकाश शेंडे उपस्थित होते.
त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, पोंभुर्णा येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना बावणे यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत सिडाम, प्रतिप कोडापे, सुरज बेताल, रितिक मेश्राम, भूषण इप्पलवार, दीपक उरकुंडे, रोहित आदे आणि ओमप्रकाश शेंडे उपस्थित होते.
या उपक्रमाचे नागरिक, पालक, शिक्षक आणि रुग्णालय प्रशासनाने कौतुक केले. वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न ठेवता समाजहितासाठी साजरा करण्याचा माणुसकीची हाक फाउंडेशनचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



