ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

25 जुलै रोजी सिंदखेड राजा येथे विदर्भ राज्य निर्माण जनसंकल्प मेळावा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारा माँ जिजाऊंचे माहेर सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांच्या स्मृती दिनी , आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विदर्भ मिशन 2027 अंतर्गत दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संत सावता माळी सभागृह, नगर परिषद सिंदखेड राजा येथे विदर्भ राज्य जनसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्यात विदर्भ राज्याशी निगडीत ज्वलंत विषयावर विविध सत्रातून मान्यवर संबोधीत करणार आहे.

मेळाव्याचे उद्घाटन किसान ब्रिगेड चे अध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती चे संपादक मा. प्रकाशभाऊ पोहरे यांचे हस्ते होईल, अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध विधीतज्ञ ॲड नीरज खांदेवाले राहणार आहे, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वागताध्यक्ष राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज मा शिवाजी राजे जाधव, माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती चे अध्यक्ष ॲड वामनराव चटप, सिंदखेड राजा चे नगराध्यक्ष सौरभ तायडे, वामनराव जाधव, प्रवीण गीते, तेजराव मुंढे, ॲड सुरेश वानखडे, बालाजी सोसे, मनीष जाधव, दत्तात्रय काकडे, बद्रीनाथ बुधवत तथा इतर उपस्थित राहणार आहे.

विदर्भाचे स्वतंत्र राज्य का हवे या विषयावर खुले अधिवेशन दुपारी 3 वाजता माजी आमदार तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली होईल, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, माजी खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे, जनमंच चे राजीव जगताप, माजी राज्य मंत्री डॉ रमेश गजबे, प्रा मंजुषा तिरपुडे, अरुणभाऊ केदार, सुनील चोखारे, तात्यासाहेब मत्ते, ॲड अविनाश काळे, संभाजी शिर्के, दामोदर शर्मा, प्रा. डॉ. वंदना काकडे, कैलास फाटे, देविदास कणखर, ॲड रामेश्वर मेहेत्रे, प्रा दिलीप नाईकवाड, डॉ  शिवाजी खरात राहणार आहे.

विदर्भ राज्य निर्माण जनसंकल्प मेळाव्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड वामनराव चटप, डॉ श्रीनिवास खांदेवाले, प्रकाशभाऊ पोहरे, शिवाजी राजे जाधव, तथा इतरांनी केले आहे,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये