ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपरवाही येथे कर्करोग जनजागृती कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट

दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी उपरवही येथील अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या कार्यालयातील सेडी हॉल मध्ये कोरपणा व जीवती तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच अंबुजा सिमेंट फाउंडेशन मार्फत कार्यरत आरोग्य सखी साठी “सामान्य कर्करोग” मुखाचा कर्करोग,स्तनांचा कर्करोग, व गर्भाशयाच्या कर्करोगाच्या जनजागृतीची कार्यशाळा संपन्न झाली .

सदर कार्यशाळे त उद्घाटना प्रसंगी अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री .श्रीकांत कुंभारे आरोग्य विभागाचे समन्वयक श्री जितेंद्र बैस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे उपस्थित होते.

सदर कार्यशाळेला टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर चे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. आशिष जी बरारब्दे,कार्यक्रम समन्वयक श्री सुरजजी साळुंखे ,दंत चिकित्सक डॉ. ट्विंकल डेंगळे व कुमारी अर्पणा यांनी मार्गदर्शन केले .

असंसर्गजन्य आजार कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पद्मजा बोरकर मॅडम, व समन्वयक श्री संजय साळवे सुद्धा उपस्थित होते.

या कार्यशाळेत मुखरोग स्तनांचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग तपासणीसाठीच्या पद्धती,निदानाच्या पद्धती,उपचार याबद्दल उपस्थित वैद्यकीय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक व आरोग्य सेविका तसेच आरोग्य सखी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथील आरोग्य कर्मचारी सुद्धा हजर होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या कु. कल्पना मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील श्री देवलकर यांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये