ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तहसिलदारांना शासकीय वाहनच नाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी याना शासकीय वाहन नाही, हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल, माञ हे वास्तव आहे. जिवती तालुक्यातील ८३ गावांचा कारभार चालवणा-या महसूल विभागाचे तहसील कार्यालयाला तब्बल ३ वर्षापासून शासकीय वाहन उपलब्ध नसल्याने तहसिलदारांना कुठेही नैसर्गिक आपत्ती वा अनूचित प्रकार घडल्यास; घटनास्थळी पोहोचण्यासाठी चक्क दुचाकी खाजगी गाडी किंवा गट विकास अधिकारी यांचे शासकीय वाहनावर फिरावे लागत असल्याचे विदारक चिञ बघायला मिळत आहे.

जिवती तालुक्यात शासकीय कार्यालयातील आढावा घेतला असता, जवळपास सर्व विभागाकडे शासकीय वाहनाची सोय आहे, परंतु ८३ पेक्षा अधिक गावांचा महसुली कारभार चालवणा-या तहसिलदारांनाच तीन वर्षापासून शासकीय वाहन नाही.

काही दिवसापूर्वी जिवती येथे तहसिलदार शेंबटवाड रुजू झाले आहे, परंतु त्यांना शासकीय वाहन उपलब्ध झाले नसल्याने शेंबटवाड सुद्धा आता शासकीय कामासाठी पंचायत समिती जिवतीचे गट विकास अधिकारी रिजेवाड यांचे शासकीय वाहन किंवा स्वतःच्या दुचाकी वाहनाचा वापर करताना दिसत आहेत. माहे:जुलै/२०२३ मध्ये जिवती तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तहसिलदार शेंबटवाड यांनी अतिवृष्टीने झालेल्या घरांची पडझड व शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्याकरीता चक्क पावसात भिजून दुचाकीने नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेतीची पाहणी केली. तहसिलदारांनाच गाडी नाही, तर सामान्य माणसांची काय अवस्था अशी जनमाणसात चर्चा सुरु आहे.

“तहसिलदारांच्या कार्यालयाला शासकीय वाहन नाही, ही बाब खरी असून, याबाबत तहसिलदार यांचेकडून अधिकची माहिती जाणून घेऊन, पालकमंञ्याना निवेदन देऊन, गाडी उपलब्धतेसाठी विनंती करण्यात येईल.”

– महेश देवकते, माजी उपसभापती, पं.स.जिवती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये