सराफा दुकान फोडीचे गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन अज्ञात आरोपीतांना ४८ तासाचे आत निष्पन्न करुन ०३ आरोपीतांना केली अटक
आरोपीच्या ताब्यातुन सोन्या, चांदीचे दागिने असा एकुण मुद्देमाल ७,१३,९५०/- रूपयेचा केला जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २६/०५/२०२६ रोजी फिर्यादी नामे श्री. संजय भगवान उदावंत, वय ४२ वर्ष, रा. फत्तेपुरे ले आउट, वर्धा तहसील जि. वर्धा यांनी पो. स्टे. रामनगर जि. वर्धा येथे रिपोर्ट दिली की, दि. २५/०५/२०२६ रोजी रात्रीच्या दरम्यान त्यांचे म्हाडा शॉपिंग कॉम्पलेक्स दुकान नं. ११ आय.टी.आय. कॉलेज जवळ जुनी म्हाडा कॉलनी, वर्धा येथील त्यांचे मालकीचे भवानी ज्वेलर्स नावाचे सराफा दुकानाचे शटर तोडुन आतमध्ये प्रवेश करून दुकानातील काउन्टर मधील काचेच्या कप्यातील चांदीचे जोडवे, चांदीच्या अंगठया, घुंगरू पायल, चांदीच्या पायल, चांदीच्या चैन, चांदीचे लॉकेट असे एकुण ९ किलो ३६० ग्रॅम वजनाचे चांदी कि. ७,०२,०००/- रूपये व सोन्याचे नाकातील बेसर १६ ग्रॅम वजनाचे कि. १,२८,०००/- रूपये असा एकुण ८,३०,०००/- रूपये चा मुद्देमाल चोरून नेला आहे अश्या तकार वरून पोलीस स्टेशन, रामनगर जिल्हा वर्धा येथे अपराध कमांक ४९७/२०२६ कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) बि.एन.एस. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा अंत्यत गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी सदर गुन्हयात विशेष प्राधान्य देवुन स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे ०४ पथके तयार केली. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे ०४ पथक समांतर तपास करीत असतांना घटनास्थळ जवळील प्राप्त सि.सि.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक पुराव्याचे अवलोकन करून प्राप्त माहीतीचे आधारे सराफा दुकान फोडी चे गुन्हे करणारे आंतरराज्यीय गुन्हेगार आरोपी नामे:-१) साहील धिरज लांजेवार,२) अफरोज समशाद अन्सारी,३) संघर्ष कैलास बागडे
४) एक वि. सं. बालक सर्व रा. नागपुर यांनी केला असल्याचे खात्री झाल्याने आरोपीतांचा नागपुर येथे जावुन शोध घेतला असता आरोपी नामे १) साहील धिरज लांजेवार वय २० वर्षे, रा. प्लॉट क. ८६० बुध्दनगर चंद्रमनी पाली बुध्दविहार, पाचपावली नागपुर हा दि. २७/०५/२०२६ रोजी त्याचे राहते घरून मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत कौशल्यपुर्ण सखोल विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) अफरोज समशाद अन्सारी, रा. आंबेनगर, नागपुर,२) संघर्ष कैलास बागडे, रा. वार्ड क. ०१ खापरखेडा, नागपुर ३) एक विधी संघर्षीत बालक रा. नागपुर यांचेसह दि. २५/०५/२०२६ रोजी रात्रदरम्यान नागपुर येथुन वर्धा येथे दोन मोपेड गाडीने येवुन वर्धा येथील भवानी ज्वेलर्स चे शटर वाकवुन दुकानात प्रवेश करून दुकानातील सोने, चांदीचे दागिने चोरून नेले असल्याचे सांगितले. उर्वरीत आरोपीतांचा जिल्हा नागपुर येथे शोध घेतला असता आरोपीतांना पोलीस आल्याची माहीती मिळताच तीन आरोपी हे नागपुर येथुन ओला कार ने बिहार राज्य येथे पळुन गेल्याने आरोपीतांचा बिहार राज्य पर्यंत सतत ४८ तास पाठलाग करून आरोपी हे जिल्हा नागपुर येथे परत आल्याने आरोपीतांचा पोलीस स्टेशन यशोधरानगर जि. नागपुर हद्दीत सापळा रचुन आरोपी नामे अनु. क्र.१)आरोपी नाव व पत्ताअफरोज समशाद अन्सारी, वय २४ वर्षे, रा. आंबेनगर नागपुर,आरोपीची सध्यास्थिती
पि.सी.आर.दि. ०३/०६/२०२६ पावेतो पो. स्टे. रामनगर २दाखल गुन्हे घरफोडी :- ०९ गुन्हे नागपुर (शहर) ०७गुन्हे नागपुर (ग्रामीण) गुन्हे ०२ संघर्ष कैलास बागडे, वय १८ वर्षे, रा. वार्ड क. ०१ खापरखेडा, नागपुर पि.सी.आर.
घरफोडी :- ०१ गुन्हा ०१ गुन्हा नागपुर (शहर) ३व ४दि. ०३/०६/२०२६ पावेतो पो. स्टे. रामनगर साहील धिरज लांजेवार वय २० वर्षे, रा. प्लॉट क. ८६० बुध्दनगर चंद्रमनी पाली बुध्दविहार, पाचपावली नागपुर पि.सी.आर.
घरफोडी : १० गुन्हे नागपुर (शहर) १० गुन्हे वि. सं. बा. ०१ दि. ०३/०६/२०२६ पावेतो पो. स्टे. रामनगर बाल दाखल सुधार गृहात घरफोडी ०३ गुन्हे जिल्हा भंडारायांना ताब्यात घेवुन आरोपीतांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीतांकडुन गुन्हयातील चोरून नेलेल्या सोने चांदीचे दागिन्यापैकी
१) चांदीचे जोडवे वजन ०२ किलो १०० ग्रॅम कि. १,५५,२००/- रूपये,
२) चांदीच्या अंगठया वजन २०० ग्रॅम कि. १५,०००/- रूपये,
३) चांदीच्या स्टोनच्या अंगठया वजन २५० ग्रॅम कि. १८,७५०/- रूपये,
४) घुंगरू पायल वजन ९५० ग्रॅम कि. ७१,२५०/- रूपये,
५) चांदीची पायल वर्जन ४ किलो ५०० ग्रॅम कि. ३,३७,५००/- रूपये,
६) चांदीची चेन वजन ९५० ग्रॅम कि. ७१,२५०/- रूपये,
७) ०३ ग्रॅम वजनाचे सोन्याची नथ कि. ४५,०००/- रू. असा एकुण ७,१३,९५०/- रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
चारही आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले. चारही आरोपीतांचे विरूध्द जिल्हा नागपुर हद्दीतील तसेच बाहेर राज्यातील पोलीस स्टेशन येथे विविध चोरी, घरफोडी सारखे अंत्यत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.
सदरची कार्यवाही श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सदाशीव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. आशिषसिंग ठाकुर, योगेश लाडे, पो.उपनि, विजयसिंग गोमलाडु, ओमप्रकाश नागापुरे, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, भुषन निघोट, शेखर डोंगरे, अमरदिप पाटील, प्रमोद पिसे, धर्मेंद्र अकाली, दिनेश बोथकर, अमोल नगराळे, जगदीश डफ, अक्षय राउत, दिपक जंगले, पवन पन्नासे, मंगेश चावरे, विकास मुंडे, आशिष उमेकर, अरविंद इंगोले, रितेश कुराडकर, मंगेश आदे, राहुल अधवाल, सुगम चौधरी, शुभम राउत सर्व नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.



