ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सांवगी व पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन 4,90,000/- रु. चा मुद्देमालासह ज्यामध्ये 33.5 ग्रॅम सोने व 40 ग्रॅम चांदी जप्त

वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

एप्रील महिन्यात व मे महिन्यात 2026 मध्ये पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे होत असलेल्या सततच्या घरफोड्या गुन्हयांचा संबंधाने वर्धा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी या घटनांना गांभीर्याने घेवुन आरोपी निष्पन्न करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना आदेशीत करुन दोन वेगवेगळे पथक तयार करुन प्रत्येक घरफोडीच्या ठिकाणी पथकानी पाहणी करुन आजुबाजुचे परिसरातील सिसिटीव्ही फुटेज प्राप्त केले.

तसेच प्रत्येक घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे प्राप्त करुन अश्या पध्दतीचे गुन्हे करणारे आरोपीतांना तपासणी करतांना कुख्यात घरफोडी करणारा आरोपी पोचन्ना उर्फ घनश्याम देऊळकर, रा. गिट्टीखदान बोरगांव मेघे, वर्धा याने त्याचा साथीदार यशवंत दांडेकर, रा. गिट्टीखदान, बोरगांव मेघे, वर्धा याचे सोबत मिळुन घरफोडी केली असल्याचे निष्पन्न केले व दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता यशवंत दांडेकर हा हिंगणा, नागपुर येथे पळुन गेल्याचे माहिती प्राप्त करुन त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने पोचन्ना उर्फ घनश्याम देऊळकर याचे सोबत पो.स्टे. सावंगी हद्दीत साईनगर, नंदनवन नगर, गौरीनगर येथे व पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीत साहु ले आऊट, गणेश नगर या ठिकाणी मागिल दोन महिन्यात घरफोड्या केल्याचे सांगितले. तसेच सदर गुन्हयांच्या संबंधाने पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) व पोलिस स्टेशन वर्धा (शहर) येथे गुन्हे नोंद असुन त्याने गुन्हयातला चोरी केलेला मुद्देमाल हा रविंद्र अशोक लोंढे, रा. अशोक नगर, वर्धा याच्या मार्फतीने सराफा व्यवसाई राजेंद्र रामकृष्ण उमाटे, रामकृष्ण ज्वलर्स, सराफा लाईन, वर्धा यांना विकल्याचे सांगितल्याने वरनमुद घरफोडीतील सर्व मुद्देमाल राजेंद्र रामकृष्ण उमाटे, रामकृष्ण ज्वेलर्स, सराफा लाईन, वर्धा यांचे कडुन जप्त करण्यात आला आहे.

याप्रमाणे नमुद पाचही घरफोडीत एकुण 33.5 ग्रॅम सोने व 40 ग्रॅम चांदी एकुण किंमत अंदाजे 4,90,000/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे यशवंत रामा दांडेकर वय 19 वर्षे राहणार गिट्टीखदान बोरगाव मेघे वर्धा घरफोडी करणारा आरोपी अटक. आरोपी नंबर (2) पोचन्ना उर्फ घनश्याम देऊळकर गिट्टीखदान बोरगाव मेघे वर्धा आरोपी पसार आरोपी नंबर (3) रविन्द्र अशोक लोंढे राहणार अशोक नगर वर्धा आरोपी अटक घरफोडीतील चोने चांदिच्या वस्तू विक्री करून देणारा.आरोपी नंबर (4) राजेंद्र रामकृष्ण उमाटे वय 63 वर्षे रामकृष्ण ज्वेलर्स सराफा लाइन वर्धा चोरीच्या वस्तू विकत घेणा-या सराफा व्यावसायिक सावंगी मेघे पोलिस स्टेशनचे उघडकीस आणलेले तीन गुन्हे 1) अपराध क्रमांक 301/ 2026 कलम 305 (अ) 331(3) 331 (4) भारतीय न्याय संहिता चोरी गेलेला मुद्देमाल 2) 378/2026 कलम 305(अ)331(4) भारतीय न्याय संहिता. 3) अपराध क्रमांक 429/2026 कलम 305 (अ) 331(3) 331(4) भारतीय न्याय संहिता. पोलिस स्टेशन वर्धा शहर (1) अपराध क्रमांक 520/2026 कलम 305(अ) 331(4) भारतीय न्याय संहिता (2) अपराध क्रमांक 373/2026 कलम 305 (अ) 331(4) भारतीय न्याय संहिता दाखल करण्यात आली आहे अटक आरोपीतांवर दाखल गुन्हे आरोपी नंबर (1) पोचन्ना उर्फ घनश्याम देऊळकर राहणार गिट्टीखदान बोरगाव मेघे वर्धा घरफोडी करणारा आरोपी पसार यांच्यावरील वर्धा व नागपूर जिल्हात पुर्वीचे घरफोडीचे 7 गुन्हे दाखल. घरफोडी करणारा आरोपी नंबर (2) यशवंत रामा दांडेकर वय 19 वर्षे राहणार गिट्टीखदान बोरगाव मेघे वर्धा पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे एक गुन्हा दाखल.

घरफोडीतील चोरीचा सोनं चांदीचा माल विक्री करून देणारा आरोपी नंबर (3) रविन्द्र अशोक लोंढे राहणार अशोक नगर वर्धा मुदाका अन्वये एक गुन्हा सन 2023 दाखल.चोरीचा गुन्ह्यातील सोनं चांदीचा मुद्देमाल खरेदी करणा-या आरोपी नंबर (4) राजेंद्र रामकृष्ण उमाटे रामकृष्ण ज्वेलर्स सराफा लाइन वर्धा व्यवसायी सन 2013 मध्ये पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे कलम 380 ,511,+34 भादवी अन्वये गुन्हे दाखल आहेत सदरची ही पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार नरेंद्र पाराशर पोलिस शिपाई मिथुन जिचकार दिपक साठे प्रफुल्ल पुनवटकर स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व सायबर शाखा वर्धा चे पोलिस हवालदार दिनेश बोथकर यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये