ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा वाहतूक शाखेची धडक कारवाई ; मद्यधुंद वाहन चालकांवर गुन्हे दाखल

विलास पाटील पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा वाहतूक पोलिस विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली असून, २८ मे २०२६ रोजी वाहन तपासणी दरम्यान दोन मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार पोहेकॉ मुकेश राऊत व पोलीस शिपाई दिलीप कामडी यांनी वाहन तपासणी करत असताना किशोर रामकृष्ण वाढाई (वय ५०, रा. इंदिरा नगर वार्ड क्र. ४, वर्धा) यांची मेडिकल तपासणी केली असता त्यांच्या रक्तात ३००.९ mg% प्रमाणात अल्कोहोल आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कलम १८५ तसेच इतर मोटार वाहन कलमानुसार कारवाई करण्यात आली.तसेच दुसरे वाहन चालक स्वप्नील विनोद मानकर (वय १७, रा. वर्धा) यांची तपासणी केली असता त्यांच्या रक्तात 1२२.६ mg% प्रमाणात अल्कोहोल आढळून आले. संबंधित चालक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मद्यपान करून वाहन चालवू नये, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा. जिल्ह्यातील ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेकडून देण्यात आली. हि कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार मुकेश राऊत पोलिस शिपाई दिलीप कामडी यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये