ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन वाहन चालकावर वाहतूक शाखेने ठोकावला पाच हजार रुपयांचा दंड

उमेश पांडे पोलिस हवालदार वाहतूक शाखा वर्धा यांनी केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 28 मे 2026 रोजी वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी आपली ड्युटी करीत असताना वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार उमेश पांडे ही आपली ड्युटी करीत असताना त्यांना एक अल्पवयीन मुलगा नामे साहिल प्रभाकर ठाकरे वय 16 वर्ष राहणार वर्धा दुचाकी वाहन बर्गमॅन गाडी क्रमांक एम एच 32- ऐ.टी.-7253 हा दुपारी 4 वाजता दरम्यान बजाज चौकातून मोठ्या स्पिडने गाडी चालवताना वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदार उमेश पांडे यांना दिसून आल्याने त्याला थांबवले असताना त्याला विचारले असताना त्याच्या कडे दुचाकी वाहनांचे लायन्स सुध्दा दिसून न आल्याने आणि तो अल्पवयीन असल्याचे दिसून आले.

या करीता वाहतूक नियम मोडून वाहन चालविणे कायद्यानुसार चुकीचे आहे याकरिता त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि बजाज चौकात एका व्यक्तींचा पडला असताना त्याला पण मोबाइल परत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार उमेश पांडे व नायक लेडीज पोलिस शिपाई प्रमोदीनी ढोढरमल यांनी केली आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये