ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे ते शेगाव बसचा भीषण अपघात

१प्रवाशी जागीच ठार,२ जण गंभीर जखमी,१९ जण किरकोळ दुखापत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जालना चिखली महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडे पाच वाजे दरम्यान रामनगर फाट्याजवळ ट्रकच्या मागच्या बाजूला एसटी महामंडळ बसने जबर धडक दिल्याने मोठा अपघात झाला असुन यामध्ये या

भीषण अपघातात १ पुरूष प्रवाशी जागीच ठार झाला असुन २जण गंभीर जख्मी असुन बसमधील इतर १९प्रवाशी किरकोळ जख्मी झाले आहे

याबाबत तालुक्यातील अंढेरा पोलिस सु‌ञांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडे पाच वाजे दरम्यान रामनगर फाट्याजवळ पुणे -शेंगाव बस शेगावला जात असताना रामनगर फाट्याजवळ साखरेचे पोते भरलेला ट्रकला ओव्हर टेक करण्याच्या नादात भरधाव बसने ट्रकच्या मागच्या बाजूला धडक दिल्याने सदर अपघात झाला असून यामध्ये एक प्रवासी जागीच ठार झाला असुन २जण जण गंभीर जख्मी झाले असुन इतर १९प्रवाशी किरकोळ जख्मी झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असुन सर्व गंभीर जख्मी प्रवाशांना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन गंभीर जख्मी प्रवाशांना चिखली येथील खाजगी जंजाळ हाॕस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे.सदर अपघातामुळे एका गाईडने वाहतूक ट्राफिक अंढेरा पोलिसांनी तात्काळ सुरळीत केली.यामध्ये आंचरवाडी,रामनगर,मेरा खुर्द येथील नागरिकांनी जख्मीनां बाहेर काढत उपचारासाठी चिखली येथे दाखल करण्यासाठी मदत केली.यावेळी पीएसआय हरिहर गोरे व गोरख राठोड,मोंरसिंग राठोड,सोनकांबळे,चालक अरुण खार्डे, रामेश्वर आंधळे,हे कर्मचारी हजर होते.यांनी तात्काळ जख्मी प्रवाशांना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनास्थळी देऊळगाव राजाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम यांनी भेट दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये