ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई 

आरोपी गजाआड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

चंद्रपूर :_ गडचांदूरकडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका १२ चक्का ट्रकमधून अवैधरीत्या अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कोरपना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून २ किलो २६७ ग्रॅम ‘डोडा पावडर’ आणि ट्रक असा एकूण १० लाख ९ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी जम्मू काश्मीरच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दि. १८ मे २०२६ रोजी पोलीस मुखबिराकडून कोरपना पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, गडचांदूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये (क्रमांकः जेके २१ सी४५९९) ड्रायव्हरच्या केबीनमध्ये अवैधरीत्या अंमली पदार्थ घेऊन जाण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन शासकीय पंच, मापारी आणि फोटोग्राफर यांना सोबत २.२६७ कि.ग्र. अंमली पदार्थ जप्त घेतले.

गडचांदूर ते कोरपना रोडवरील वनसडी येथील शोयब सुपर मार्कटसमोर पोलिसांनी सापळा रचला. संशयास्पद ट्रक येताच तो थांबवून चालकाला झडतीबाबत रीतसर माहिती देण्यात आली.

ट्रकची आणि चालकाची झडती घेतली असता, पोलिसांना चालकाच्या केबीनमध्ये एका पांढऱ्या गोणीत ४ हिरव्या रंगाच्या पॉलिथिन बॅग आढळल्या, यामध्ये डोडा पावडरः २. २६७किलोग्रॅम (अंदाजे किंमत रु. ९,०६८) १२ चक्का ट्रक अंदाजे किंमत रु. १०,००,०००/- एकूण जप्त मुद्देमालः रु. १०,०९, ०६८ प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि क्लिनरविरुद्ध एन. डी. पी. एस. कायद्याच्या कलम ८ (क), १५ (ब), २९ अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.

यात जसवंतलाल श्रीबिसन दास (४०) – ट्रक चालक, सोनू लवकुमार शर्मा (३६) क्लिनर (दोघेही रा. घगवाल, ता. जि. सांबा, जम्मू-काश्मीर) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये