ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन रामनगर डायल 112 पथकाची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 19/05/2026 रोजी डायल 112 पथकातील पोलीस हवालदार नितिन ताराचंदी यांना गोपनीय खबर मिळाली की सिंधी मेघे वर्धा येथे राहणारा ऋषिकेश बादलमवार हा त्याचे ताब्यातील इलेक्ट्रिक मोपेड गाडी क्र.MH 32 AZ 0504 चे पायदानावर एका निळ्या रंगाचे पन्नीमध्ये विदेशी दारू मालाची वाहतूक करीत रामनगर कडून स्वावलंबी ग्राउंडने बॅचलर रोड कडे जाणार आहे अशा खबरे वरून पोलीस स्टाफ पंचासह स्वावलंबी ग्राउंड वर्धा येथे नाकेबंदी करून यातील आरोपी रूषीकेश प्रभाकर बादलमवार वय 21 वर्ष रा.भाईमारे लेआऊट सिंदी मेघे वर्धा याचेवर प्रो रेड केला असता त्याचे ताब्यातून (1) 180 एम.एल.च्या राँयल स्टँग कंपनिच्या काचेच्या विदेशी दारूच्या 24 सिलबंद शिशा प्रती नग 350/- रू.प्रमाणे किं.8,400/- रू. (2) 180 एम.एल.च्या आँफीसर चाँईस कंपनिच्या विदेशी दारुच्या 48 प्लास्टीक च्या सिलबंद शिश्या प्रती नग 250/- रू.प्रमाणे किं.12,000/- रू. (3) अंगझडतीत खिशात एक जुना वापरता रियलमी कंपनिचा अँन्ड्राँईड मोबाईल किं.5000/- रू. (4) दारूची वाहतूक करण्याकरता वापरलेली एक जुनी वापरती काळ्या रंगाची ईलेक्ट्रीक मोपेड गाडी क्र.एम.एच.32 ऐ.झेड.0504 कि.1,20,000/- रू. असा एकुण जुमला किंमत 1,45,400/- रू. चा मुद्देमाल जप्त केला.

सदर आरोपी ऋषिकेश बादलमवार याला विदेशी दारू कोणाची आहे अशी विचारपूस केली असता त्याने सदरची विदेशी दारू ही आकाश ऊर्फ चकन मोटघरे रा.रामनगर वर्धा याची असल्याचे सांगितल्याने व त्याचे सांगण्यावरून विदेशी दारूचा माल विक्री करता घेऊन जात असल्याचे पंचासमक्ष सांगितले सदर गुन्हा आरोपींनी संगणमताने केल्याने आरोपीताविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 479/2026 कलम-65 (अ),(ई),77 (अ),83 म.दा.का. सहकलम 3(1)181, 130/177 मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंद केला.

सदर प्रो रेड कार्यवाही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल पेालीस अधिक्षक साहेब वर्धा, मा. श्री. सदाशिव वाघमारे अपर पेालीस अधिक्षक साहेब वर्धा, मा. श्री. प्रमोद मकेश्वर उपविभागीय पेालीस अधिकारी साहेब वर्धा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे मॅडम पो.स्टे. रामनगर, यांचे निर्देशानुसार पोलीस हवालदार मंगेश शेंडे, नितीन ताराचंदि पोलीस अंमलदार शरद सानप प्रकाश खार्डे , पोलीस स्टेशन रामनगर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये