वर्धा शहर पोलिसांचे आवाहन : अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. संबंधित महिला ही गोऱ्या वर्णाची असून तिचे वय अंदाजे 60 वर्षे आहे. तिची उंची सुमारे 5 फूट 4 इंच असून चेहरा गोलाकार आहे. महिलेच्या डाव्या हातावर गोदलेले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सदर प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 अन्वये पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत मृत महिलेची ओळख पटू शकलेली नाही.
या महिलेची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी वर्धा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे संपर्क साधावा पोलिस उपनिरीक्षक गिताजंली गारगोठे….
फोन : 07152-232506
मोबाईल : 7030709233



