ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. भोंगळेच्या हस्ते गोंडपिपरीत मका खरेदी केंद्राचा उद्या शुभारंभ

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीला यश, शेतकरी वर्गात आनंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मका खरेदी करून साठवणूक करण्यासाठी पुरेशी गोदामांची व्यवस्था नसल्याने अजूनपर्यंत मका खरेदी सुरू करण्यात आलेले नव्हते. यासाठी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका खरेदी सुरू करून गोदामांची उपलब्धता करून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्याकडे मागणी केली आहे. शेवटी या मागणीला यश आले असून, उद्या (१९ मे) स्थानिक तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या शासकीय गोदामात मका खरेदी शुभारंभ पार पडणार आहे.

गोंडपिपरी कार्यक्षेत्रात रब्बी हंगाम २०२५_२६ मध्ये मक्याचे उत्पादन भरपुर प्रमाणात झाले. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरीला मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसुद्धा सुरू केली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या पत्रानुसार तहसील कार्यालयाच्या शासकीय धान्य गोदामात मका खरेदी सुरू करण्याबाबत कळविण्यात आले. याचाच आधार घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन मका खरेदी करण्याकरिता गोदामांची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांची भेट घेऊन करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी केलेल्या मागणीवर राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी तत्काळ दखल घेऊन शासकीय गोदामात मका खरेदी सुरू करण्याकरिता पाठपुरावा केला. आज या मका खरेदी केंद्रामार्फत मका खरेदीचा शुभारंभ आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात येणार आहे.

या शुभारंभ सोहळ्याला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, उपसभापती स्वप्नील अनमुलवार यांच्यासह समस्त संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये