“भक्ती, विकास आणि जनसंवादाचा त्रिवेणी संगम”
हनुमान गुढा येथे विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अमलनाला रोड वरील प्रभाग क्र. ९ मधील हनुमान गुढा येथील पुरातन हनुमान मंदिर, येथे भक्तिमय वातावरणात हनुमान चालीसा पठण कार्यक्रम पार पडला. यात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
यानंतर माणिकगड सिमेंट यांच्या CSR माध्यमातून नगरपरिषद हद्दीत करण्यात आलेल्या ३५० मीटर रस्त्याच्या विकासकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. हा रस्ता केवळ विकासकाम नसून परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन सुविधांना बळकटी देणारा महत्त्वपूर्ण ठरला आहे.
यावेळी इरिगेशन कॉलनी परिसरातील दूषित पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांची भूमिका नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी मांडली. त्यावर माणिकगड सिमेंटचे ईआर हेड श्री. नवीन कौशिक यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
सिमेंट रोड चे उद्घाटन नगराध्यक्ष निलेश ताजने यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी श्री. संजय मेंढी (उपनगराध्यक्ष, नगर परिषद गडचांदूर) उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीत श्री. रामसेवकभाऊ मोरे (बांधकाम सभापती), श्री. महादेवभाऊ एकरे, श्री. महादेवजी जैस्वाल, श्री. संदीपभाऊ शेरकी, श्री. महेश आवारी (नगरसेवक), श्री. सरवर भाई (पाणीपुरवठा सभापती), श्री. चेतन शेंडे (नगरसेवक), श्री. सतीशभाऊ बेतावर (नगरसेवक), सौ. अश्विनीताई कांबळे (नगरसेविका), सौ. सारिकाताई डोर्लीकर (नगरसेविका), सौ. मनिषाताई परचाके (नगरसेविका), सौ. संगीताताई गौत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष अतिथी म्हणून श्री. नवीन कौशिक (ईआर हेड, माणिकगड सिमेंट) उपस्थित होते त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी कुणाल पारखी, सुयोग कोंगरे, मयूर पोटदुखे, इम्रान शेख, राधेश्याम चुट्टे, पराग पोटदुखे, योगेंद्र केवट, श्रीकांत घोरफडे, विक्की मेळावार यांच्यासह हनुमान गुढा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



