ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीच्या अयान अजाणीची सीबीएसई बारावीमध्ये घवघवीत कामगिरी

९९.६० टक्के गुणांनी उज्ज्वल यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली येथील नारायणा विद्यालयमचा विद्यार्थी अयान अब्बास अलीहुसैन अजाणी याने सीबीएसई बारावीच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आज जाहीर झालेल्या निकालात अयानच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अयान हा अभ्यासू, शिस्तप्रिय आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. अयानने दहावीत सीबीएसई बोर्डातून ९८.८० टक्के गुण घेत चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला होता.

आपल्या यशाचे श्रेय त्याने आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे. अयानचे वडील अलीहुसैन अजाणी आणि आई निलम अलीहुसैन अजाणी यांनी मुलाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्याच्या मेहनतीचे कौतुक केले. शिक्षणासोबतच सकारात्मक वातावरण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच अयानला हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेच्या शिक्षकांनीही अयानचे अभिनंदन करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अयानच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये