ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डी. बी. पथकाची मोठी कारवाई ब्रह्मपुरीत देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ शहरातील फासी चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराच्या अड्ड्यावर ब्रह्मपुरी पोलिसांनी आज दि. १४ मे २०२६ रोजी मोठी कारवाई केली आहे. या धाडसी कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फासी चौक परिसरातील एका ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू आहे. या माहितीची शहानिशा केल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस दलाने आज सायंकाळच्या सुमारास अचानक या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन महिलांपैकी एक महिला ही ‘पीडित’ असून, दुसरी महिला या व्यवसायात मध्यस्थी करणारी किंवा देहव्यापार चालवणारी मुख्य आरोपी असल्याचे समजते. सध्या या दोघीं कसून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाचे धागेदोरे खोलवर पसरलेले असून ब्रह्मपुरी पोलीस आता या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेत आहेत. या कारवाईत लवकरच काही ‘मोठे मासे’ गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि हा व्यवसाय किती काळापासून सुरू होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

भरवस्तीत सुरू असलेल्या या प्रकारावर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे डि.बी. पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये