ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हायवा ट्रकची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू

गोंडपिपरीतील धाबा पॉईंटवरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी शहरातील धाबा पॉईंट येथे आष्टीकडून बल्लारपूरकडे जाणाऱ्या हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, दुचाकीवर असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १४) रोजी दुपारी एक वाजता घडली. तेलंगणा राज्यातील, आदिलाबाद जिल्ह्यातील, पारगाव निवासी ज्योती हिरामण चंकपुरे (४० वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे.

   सविस्तर वृत्त असे की, आज शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता आष्टीवरून बल्लारपूरकडे जाणाऱ्या हायवा ट्रकने (एम.एच.३४, बी.जी.९३५४) धाबा टर्निंग पॉईंटवर एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ज्यामुळे दुचाकीवरून महिला खाली पडल्याने, ट्रकच्या टायरने पुन्हा धक्का बसला. जखमी अवस्थेत महिलेला स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला.

       गोंडपिंपरी पोलिसांकडून तत्काळ हायवा ट्रक जप्त करण्यात आला असून, ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर ट्रक हा सुरजागड येथील मालवाहतूक करणाऱ्या सचिन जैन नामक कंपनीचा असल्याचे समजते. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये