ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान उत्साहात

गॅस, बेबी किट व लॅपटॉप वाटपाने अभियान ठरले लक्षवेधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तहसील कार्यालय जिवती येथे ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान उत्साहात पार पडले. तहसीलदार रुपाली डी. मोगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपसभापती महेश देवकते यांच्या हस्ते करण्यात आले.

      कार्यक्रमाला नगरपंचायत उपाध्यक्ष जमालुद्दीन शेख, भाजपा तालुका अध्यक्ष दत्ता राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये ग्राम विस्तार अधिकारी बांबोडे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती गावडे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. लंगडे, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचा समावेश होता.

     अभियानांतर्गत पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले. महिला व बाल विकास विभागाने बेबी किटचे वितरण केले, तर महसूल विभागाकडून तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले. विविध शासकीय योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनिल पेंदोर यांनी केले. प्रास्ताविक तहसीलदार मोगरकर यांनी तर आभार प्रदर्शन सागर कोडापे यांनी केले.नी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये