कुकुडसाथ येथे भव्य वाहन चालक संमेलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ट्रान्सपोर्टनगर अंबुजा येथून उत्तरेला ३ किमी अंतरावर कुकुडसाथ तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे तारीख २९ एप्रिल २०२६ सकाळी १०:५० वाजता एक दिवसीय भव्य वाहनचालक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी वाहनचालक कामगार यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आणि यांच्या अन्य समस्या मार्गी लावण्यासाठी वाहन चालक कामगार संमेलन आयोजित केले आहे.
मुल्तान शहा अध्यक्ष उत्तरप्रदेश ड्रायव्हर महासंगठन उत्तरप्रदेश हे संमेलनाचे अध्यक्ष असून संघटनेचे महाराष्ट्र सल्लागार अशोककुमार उमरे संमेलनाचे उद्घाटक आहेत. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष चंपतभाऊ राजुरकर हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून यांच्या नेतृत्वाखाली संमेलनाच्या स्वागत समितीचे कार्य सुरू आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संतोषकुमार संत मध्यप्रदेश राज्य अध्यक्ष अनैशा वाहन चालक कामगार संघटन, शेख जाफर उपाध्यक्ष मध्यप्रदेश, शाकीर अली जोईया वाहन चालक सेवक राजस्थान, शेख असिफ शेख अजीज अंकलेश्वर जिल्हा संघटक गुजरात, औदुंबर जाधव सोलापूर, राहुल धोंगडे पनवेल तालुका अध्यक्ष, शेख अय्युब जिल्हा अध्यक्ष नांदेड, अहमद खान गौस खान पठाण जिल्हा महासचिव नांदेड, नामदेव मुरमुरे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ, हर्षद लहाने युवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ, हाफीज शेख जिल्हाध्यक्ष अकोला, नितीन वनखेडे जिल्हा संपर्कप्रमुख अकोला, यासिन शहा जिल्हाध्यक्ष पालघर, अविनाश राठोड तालुका अध्यक्ष दिग्रस यवतमाळ
आयोजन समिती- सुरजभाऊ उपरे संस्थापक अध्यक्ष अनैशा वाहन चालक कामगार संघटना, सुंदर कस्तुरवार, बाळू रामटेके उपाध्यक्ष, कमलेश राऊत महासचिव, अनंता रामटेके जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, चंपतभाऊ राजुरकर युवा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, संतोष वाघमारे सचिव, अनिल चुलमुले कोषाध्यक्ष, आकाश ताकसांडे, संदीप चंद्रगिरीवार तालुका अध्यक्ष बल्लारपूर, सुनील पाटील तालुका अध्यक्ष भद्रावती, ज्ञानेश्वर गोखरे संपर्क प्रमुख चंद्रपूर, हंसराज ताकसांडे युवा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर,कार्यकारिणी सदस्य मंगेश ढाले, हनुमान रामलूवार, अकील शेख, विठ्ठल जेऊरकर, अमरजितसिंह, फिरोज शेख, इंद्रिश शेख नांदेड, उस्मान शेख, सत्यपाल गौरकार उपरोक्त कुकुडसाथ येथील भव्य वाहनचालक संमेलनास जास्तीत जास्त वाहनचालक कामगारांनी सहभागी होण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.



