ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे निघाली भव्य गो सन्मान रॅली 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातून भव्य गोसन्मान आवाहन अभियान निवेदन रॅलीचे आयोजन आज 27 एप्रिल रोजी करण्यात आले. या देशभर आयोजनाची मांडणी वृंदावन येथे विविध संत,महाराज,गोप्रेमी, ध र्मप्रेमी मंडळींनी केलेली आहे. त्यानिमित्ताने तालुका तहसिल कार्यालय देऊळगाव राजा येथील तहसीलदार यांना हजारोंच्या सह्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात संपूर्ण भारतात हा दिवस गोसन्मान दिन म्हणून साजरा व्हावा.

भारतीय संसदेत कायदा पास होऊन संपूर्ण देशात गोहत्या-गोतस्करी बंदी कायदा समान पातळीवर लागू करावा. तसेच कायदा उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद करावी.

 गोसेवकांना, गोशाळांना संरक्षण मिळावे तसेच शासकीय पातळीवर गोउत्पादनांना बाजार संरक्षण मिळावे. देशी गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा प्राप्त व्हावा.

 भारतीय शिक्षण पद्धतीमद्धे गोवंश संबंधी पालनपोषण,कृषी आधारित उपक्रम व संरक्षण याबाबतचा समावेश करावा

 भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान होण्यासाठी या सर्व बाबींची संपूर्ण देशभर एकवाक्यता रहावी कोणत्याही राज्याने यात हयगय किंवा टाळाटाळ करू नये. यासाठी हे अभियान प्रथम टप्प्यात राबविले गेले.

यावेळी तहसिल मार्फत मा.मुख्यमंत्री,मा. पंतप्रधान व मा. राष्ट्रपती यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे.

पुढील वर्षभर तीन टप्प्यात हे अभियान सुरू राहील.

यावेळी संपूर्ण गावातील व्यापारी प्रतिष्ठाने,दुकाने या कालावधीसाठी बंद होती. गावातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक,नोकरदार, महिला, युवा, विद्यार्थी, धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, गोशाळेचे व मंदिर समितीचे प्रतिनिधी, वारकरी,दिंडीकरी, संत-महाराज, पत्रकार बांधव,राजकीय क्षेत्रातील विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते,सन्माननीय आजी व माजी आमदार,नगराध्यक्ष, नगरसेवक,विविध संस्थांचे प्रतिनिधी हे सर्व हिरीरीने सहभागी झाले.

स्थानिक पोलीस स्टेशन ,तहसिल प्रशासन, नगरपालिका या सर्वांचे सहकार्य लाभले. अनेक बांधवांनी जागोजागी पुष्पवृष्टी, गोमाता व नंदी पूजन तसेच पाणी व फळेवाटप केले. काही मान्यवरांनी शेवटी पुढील अभियानाची रणनिती व आवश्यकता मिडियासमोर विषद केली.तसेच सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये