ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिवस अर्थातच ग्राम जयंती म्हणून साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मानवतेचा दीप प्रज्वलित करणारे सर्वधर्मसमभावाचे साक्षात प्रतीक ठरलेले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त येसंबा ही नगरी एकदा पुन्हा त्यांच्या विचारांच्या तेजाने उजळून निघाली आहे श्री गुरुदेव सेवा मंडळ येसंबा धानोरा यांच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिवस अर्थातच ग्राम जयंती म्हणून साजरी करण्यात आली. या उत्सवाची सुरुवात परिसर स्वच्छतेच्या पवित्र उपक्रमाने करण्यात आली असून राष्ट्रसंत यांच्या पुतळ्याचे अभ्यँगस्नान सामुदायिक ध्यान चिंतनातून अंतर्मनातील शांततेचा शोध घेतल्या गेला श्री प्रमोदराव ज्ञानेश्वर हिवंज(गुरुदेव प्रचारक)यांच्या मार्गदर्शनातून विचारांची मशाल चेतवली गेली त्यानंतर येसंबा येथे संपूर्ण गावात रस्त्यावरून रामधुन पालखी काढण्यात आली.

भक्ती भाव श्रद्धा आणि एकात्मतेचे सुरेख चित्र रंगवले गेले यावेळी या उपक्रमाला खालील प्रमाणे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मिशन समृद्धी वर्धा या अंतर्गत श्री. किशोर भाऊ जगताप,पराग सर चंद्रदास डांगे, रवींद्र बुरांडे, तसेच CHO लीना गहाट (प्राथमिक आरोग्य केंद्र येसंबा) श्री. किशोरराव मुटे रा. इंजाळा (विदर्भ संघटक व संपर्क प्रमुख)तसेच काल्यानीताई किशोरराव मुटे (राष्टीय कीर्तनकार)श्री. प्रमोदजी ज्ञानेश्वर हिवंज ( गुरुदेव प्रचारक )यांच्या सहकार्यानुसार आज येसंबा गावात सामुदायिक प्रार्थना मोठ्या उत्सुकताने चालू झाली आहे.व त्यामध्ये सहकार्य आपल्या गावातील गावास्तरावर काम करणाऱ्या सौ. भावना समीर ओंकार PRP (पंचायत रिसोर्स पर्सनल) यांच्या सहकार्याने सुद्धा आज येसंबा गावात सामुदायिक प्रार्थना चालू झाली.राष्ट्रधर्म युवामंच महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्हा अध्यक्ष कु, विनोद बबनराव अगासकांडे उपस्थित होते.

तर गावातील इतर मान्यवर उपस्थित होते. गुरुदास हिवंज, विकास हीवंज, मधुभाऊ निधेकर,प्रमोद राव हिवंज, ज्ञानेश्वर राव सावरकर, प्रदीप देवतळे, अशोकराव देशमुख, सागर भाकरे, गणु लोणकर, आदेश चहांदे, निहान शेंडे, विहान पाटील, सारंग राऊत, वासु लेनगुळे, अंश मगर, तुषार लोणकर, भावना ओंकार,लावण्या लोणकर, जानवी अंबाडारे,आराध्य बुरांडे, राशी तिजारे, समृद्धी शेळके, आदिशा वटणकर, कोमल चौधरी, गुंजन राऊत, रजनी राऊत, खुशी राऊत, श्रावणी देशमुख,गुनगुन मानकर, स्वरा बुरांडे असे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . या महोत्सवातून केवळ जयंती साजरी न होता राष्ट्रसंतांच्या विचारांची बीजेपीरली गेली मानवतेच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा देणारा हा उत्सव येसंबा नगरीसाठी एक संस्कारला आहे. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित देईल दर्शविली होती या राष्ट्रसंतांच्या विचार उत्सवाची सांगता सामुदायिक प्राथमिक करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये