हिंगणीतील यशवंत विद्यालयात NMMS परीक्षेत यश – पूजा मुडेचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हिंगणी येथील यशवंत विद्यालयातील इयत्ता 8 वीच्या विद्यार्थिनींनी NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी एकूण 13 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी काही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून, त्यामध्ये पूजा नरेशराव मुडे हिने सर्वाधिक गुण मिळवून विशेष कामगिरी बजावली आहे. तिची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याने विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. 27 एप्रिल 2026 रोजी यशवंत विद्यालय, हिंगणी येथे मुख्याध्यापक श्री. नंदकिशोर श्रीधर ठाकरे यांच्या हस्ते पूजा मुडे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या सत्कार समारंभात बोलताना पूजा मुडे हिने आपल्या यशाचे श्रेय यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. समीरभाऊ देशमुख, संस्थेचे सचिव डॉ. किशोरजी आहेर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांना दिले. तिच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.



