ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यात आयपीएल सट्ट्यावर पोलिसांची मोठी धाड

निमगावचा बुकी लोमेश राजगडे अटकेत..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

पाथरी पोलिस स्टेशन अंतर्गत सावली तालुक्यातील निमगाव येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर पाथरी पोलिसांनी धाड टाकून एका बुकीला रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी लोमेश राजगडे याला अटक केली असून त्याच्याकडून २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आयपीएल सामन्यांच्या हंगामात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सट्टा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. निमगाव येथे लोमेश राजगडे हा आपल्या मोबाईलवरून क्रिकेट सामन्यांच्या हार-जितीवर पैसे लावून लोकांकडून सट्टा स्वीकारत असल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी निमगाव येथे सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपी लोमेश राजगडे याच्याकडून सट्ट्यासाठी वापरला जाणारा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सट्ट्याच्या नोंदी असलेले साहित्यही जप्त केले असून, या व्यवहारात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास सुरू केला आहे. आरोपी लोमेश राजगडे याच्यावर महाराष्ट्र जुगार बंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील सट्टेबाजांचे धाबे दणाणले आहेत.

     “तालुक्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई केली जाईल.”

                पोलीस अधिकारी, पाथरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये