ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावल्यानंतर जिल्हास्तरीय ‘सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास’ स्पर्धेत लखमापूर शाळेने पुन्हा जिल्ह्यात स्थान मिळवले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर  :_ जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत घेण्यात आलेल्या *’सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम २०२६-२७*’ च्या जिल्हास्तरीय स्पर्धेत *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर* येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी नैतिक संतोष कूचनकर याने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत नैतिकने जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या आणि कोरपना तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता विकास उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे भव्य बक्षीस वितरण नुकतेच एका शानदार सोहळ्यात पार पडले. यावेळी नैतिक कुचनकर याला मान्यवरांच्या हस्ते *१,००० रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र* देऊन गौरविण्यात आले.

या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे *पालक मंत्री मान. डॉ अशोक उईके साहेब जिल्हा परिषदेचे मान मुख्य कार्यकारी अधिकारी *मान. पुलकितसिंग,*मान. अश्विनी सोनवणे मॅडम, (शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर) उपशिक्षणाधिकारी *मान विशाल देशमुख,* डाएट (DIET) चे प्राचार्य *सन्मा. मते सर* यांच्यासह कोरपना पंचायत समिती चे गटशिक्षण अधिकारी *सन्मा कल्याण जोगदंड साहेब*, नांदगाव सूर्या बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी *मान सुनील कोहपरे* साहेब,व जिल्ह्यातील *सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि सर्व केंद्रप्रमुख आवर्जून उपस्थित होते.

इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नैतिकने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे लखमापूर शाळेचा बहुमान अधिक वाढला आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वृंद , शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी नैतिकचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये