ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त चंद्रपूरात शरबत वाटप कार्यक्रम

आरंभ बहु. संस्था व ABVP चा सेवाभावी उपक्रम

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) व आरंभ बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, चंद्रपूर येथे शरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे एप्रिल महिन्यातील तीव्र उष्णतेत नागरिकांना दिलासा देणे तसेच समाजामध्ये सेवाभाव आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणे हा आहे. या कार्यक्रमाला नागरिकांचा दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक स्वयंसेवक या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवतात.

यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला असून, शेकडो नागरिकांना थंडगार शरबत वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाज हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरंभ बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेश शंकर दिंडेवार, सचिव प्रवीण गिलबिले संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे चंद्रपूर महानगर मंत्री श्रेयश जावडे, जिल्हा गतीविधी प्रमुख ओंकार सायंकर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख रोहित चौबे, जिल्हा मीडिया संयोजक शंतनु देशपांडे, महानगर सहमंत्री आदित्य शेंडे, महानगर मीडिया सह संयोजक तृप्तेश येदनूरवार, श्रीरंग खोंड, आदित्य गच्छकेश्वर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये