उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उत्साहात साजरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला स्नेहा मेंढे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मालाअर्पण करून अभिवादन केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नेतृत्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती. स्नेहा मेंढे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी वर्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे प्रमुख रामेश्वर इंगोले कार्यालयीन अधीक्षक श्यामसुंदर संगारे सुनील शिरसाठ सचिन घनमोडे राघटाटे कनिष्ठ लिपिक तसेच कार्यालयातील इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचा व कार्याचा गौरव करत त्यांच्या समाज सुधारणा, समानता, न्याय व बंधुता या तत्वांवर प्रकाश टाकला.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रमुख स्नेहा मेंढे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या तत्वांचा अंगीकार करून आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो.”
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प घेतला. या उपक्रमामुळे शाखेमध्ये सामाजिक जाणीव आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडला



