ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कासव शिकार प्रकरणी सहा आरोपी अटकेत

सावली वनपरिक्षेत्रातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 सावली :_ वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड नियतक्षेत्र क्षेत्र सिरसी मधील चिचडोह मॅरेज परिसरात वन्यप्राणी कासवावर काळी जादू करण्यासाठी विनापरवानगीने अवैधरित्या वाहतूक करीत असताना दिनांक 12 एप्रिल 2020 रोजी 2 कासव व 3 मोटर सायकल या मुद्दे मुद्देमालासह 6 आरोपींना पकडण्यात सावली वनपरिक्षेत्राला यश आले.

कासव हा वन्यप्राणी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. कासव या प्राण्यांना काळया बाजारामध्ये अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने कासवांच्या शिकारीमध्ये वाढ होऊ लागली. त्यामुळे कासवांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागल्याने शासनाने त्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना कायद्यानुसार संरक्षण दिले आहे. कासव ही प्रजात नामशेष झाल्यास पर्यावरणाचा समतोल ढासळेल आणि पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात येईल व ऑक्सिजन पाणी अन्न वस्त्र ह्या मानवाचा मूलभूत गरजा मिळणे अशक्य होईल.

दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी मारुती फुलेवाडी क्षेत्र सहाय्यक व्याहाड महादेव मुंडे वनरक्षक शिरसी यांना कासवाची अघोरी विद्या करिता वापर करण्यासाठी अवैध वाहतूक व होत असल्याची माहिती मिळाली असता गोपनीय रित्या सापळा रचून सदरचे कासवावर काळया जादूचा प्रयोग करून परत जात असताना 1. गंगाधर पांडू बुरांडे वय 49 वर्ष,2. मोरेश्वर देविदास देवतळे वय 38 वर्ष, 3. राजेंद्र शामराव दिवसे वय 52 वर्ष, 4. ओमदेव गिताबाई शिंदे वय 25 वर्ष, 5. हेमचंद उमाजी शेंडे वय 28 वर्ष, 6. धवल उसटू वेलादी वय 30 वर्ष यांना 2 कासव व 3 मोटर सायकल या मुद्देमालासह रंगेहात पकडण्यात आले. वरील सहाही आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 204/ 232855/ 2026 दिनांक 12.04.2026 वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,44, 49,50 व 51 नुसार वन गुन्हा नोंदवण्यात आला. सदरचे सहाही आरोपींना दिनांक 13.4.2026 रोजी सावली न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने 4 दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. सदर प्रकरण अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलीस विभाग यांच्याकडे सुद्धा पुढील तपास करिता हस्तांतरित करण्यात येणार आहे.

सदर प्रकरणी राजन तलमले विभागीय वनाधिकारी चंद्रपूर, विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्वात मारुती पुल्लेवाड क्षेत्र सहाय्यक व्याहाड, नरेश सिडाम शेत्र सहाय्यक सावली करीत आहे. सदर प्रकरणाचे चौकशी दरम्यान महादेव मुंडे वनरक्षक शिरसी एकनाथ खुडे श्री डांगे, लंकेश आखाडे सुखदेव महादेव सतीश नागोसे राजू मुरकुटे निलेश बोरकर सुषमा मेश्राम कल्याणी पाल कु. शेंडे व इतर वन कर्मचाऱ्यांनी मुलाचे सहकार्य केले.

शिकारीची माहिती दिल्यास योग्य मोबदल्यासह गोपनीय नाव ठेवल्या जाईल. पर्यावरण संवर्धनात संपूर्ण वन्य प्राण्यांचा मोलाचा वाटा असून त्यांचे संवर्धनासाठी व आपल्या चांगल्या आरोग्यासाठी काळाची गरज म्हणून शिकारी थांबविण्यास सहकार्य करावे. असे आवाहन विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये