डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडून पुस्तकांचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
देवाडा खुर्द : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी गावात विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर बुद्धिस्ट युथच्या पुढाकारातून युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी सुलभ व्हावी या उद्देशाने वाचनालयाची स्थापना करण्यात आली.
या उपक्रमासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी मोलाचे सहकार्य करत स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली. यासाठी अल्का आत्राम यांनी त्यांच्याकडे विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पुस्तकांसाठी सूचना दिल्या.
यावेळी अल्का आत्राम व बंडू बुरांडे यांनीही स्वतःहून काही पुस्तके देत या उपक्रमात सहभाग नोंदवला. पुढील काळातही अधिक पुस्तकांची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सुधीर मुनगंटीवार हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील असून त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशाचे पालन करत युवकांना शिक्षणाच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला.
कार्यक्रमावेळी अल्का आत्राम, हरीश ढवस, बंडू बुरांडे, ज्योती बुरांडे, दिनेश बोबाटे, परशुराम बुरांडे, सतीश बुरांडे, संजय बुरांडे, भारत कुळमेथे, विजय वसेकर, आरती पोटवार तसेच बुद्धिस्ट युथचे कमलाकर रायपुरे, रुपेश निमसरकार, शिशुपाल थेरकर, अमोल सुखदेवे, अमित भडके, प्रतीक रामटेके, प्रशिक निमसरकार, कुमुद रायपुरे व इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



