ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती तहसील कार्यालय देवळी येथे साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला समर्थ क्षिरसागर यांनी माला अर्पण करून अभिवादन केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला आले असून 135 वर्षे पूर्ण झाले आहेत या निमित्ताने तहसील कार्यालय देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी देवळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार समर्थ क्षिरसागर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर नायब तहसीलदार राजेंद्र सयाम यांनी सुद्धा फोटोला माला अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर दिनेश झोले सहाय्यक महसूल अधिकारी यांनी व मनोज वंजारी महसूल सहाय्यक यांनी सुद्धा अभिवादन केले असून यानंतर तहसील कार्यालय देवळी येथील सर्व कर्मचारी यांनी अभिवादन केले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील आगलावे बाबू कुमारी तबस्सुम शेख शिपाई दिपक भोगे ऑपरेटर व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये