सावंगी मेघे पोलीसांकडुन शेतकऱ्यांची बैल जाडी व दुभते जनावरे चोरी करणारे चोरटयांना २४ तासात अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 12.04.2026 रोजी फिर्यादी नामे रामभाऊ दशरथजी खोत, वय 46 वर्ष, रा. बोरगाव नांदोरा, ता. जि. वर्धा यांनी पोलीस स्टेशन सावंगी मेघे ला तोंडी रिपोर्ट दिला की, दिनांक 11.04.2026 चे रात्री 22/00 वा. दरम्यान त्याचे मालकीची दोन बैल, एक गाय, एक वासरू असे शेती चे कोठ्या मध्ये बाधुन ठेवले होते. दिनांक 12.04.2026 चे सकाळी 06/00 वा. दरम्यान फिर्यादी हे शेतात आले असता त्यांचे शेतीमधील कोठयात बाधुन ठेवले दोन बैल, एक गाय, एक वासरू असे दिसुन आले. नाही. दिनांक दिनांक 11.04.2026 चे 22/00 वा. ते दिनांक 12.04. 2026 चे 06/00 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांचे दोन बैल, एक गाय, एक वासरू असे एकुण जु.की.85,000/ रू. किमंतीचे जनावरे चोरून नेले अशा फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोद करून तपासात घेतला.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली मा. ठाणेदार श्री. पंकज वाघोडे साहेब पो.स्टे. सावंगी मेघे यांनी पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील गुन्हे शोध पथक हे अज्ञात आरोपीचे व चोरीस गेलेल्या मालाचे शोधात रवाना केले. आपले तपास चक फिरवत मिळालेल्या माहीतीवरून आरोपी नामे 1) लोकेश राजु चकोले, वय 21 वर्ष, रा. केदार ले आऊट, देवळी, ता. देवळी, जि. वर्धा व आरोपी नामे 2) संजय पंडीत येदाणे, वय 29 वन, रा. सावंगी (आसोला), ता. हिगंणा, जि. नागपुर यांना ताब्यात घेवुन त्यांची कसुन चौकशी केली असता फिर्यादी यांची बैल जोडी, गाय व वासुरू त्याचे बोलोरो गाडी कमांक एम.एच./34/व्ही.जी. /9618 ने सोबत आणखी तिन आरोपीतां सोबत मिळुन फिर्यादी यांची मौजा बोरगाव शेतशिवारीत कोठयामधुन बैल जोडी, गाय व वासरू चोरी केल्याचे सागीतले.
तरी वर नमुद दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांची कडुन चोरीस गेलेली बैल जोडी, गाय व वासुरू त्याचे बोलोरो गाडी क्रमांक एम.एच./34/व्ही.जी./9618 असा एकुणन जु.की.5,85000 रूपयाचा मुदेदेमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच वर नमुद आरोपीताचा मा. न्यायलया कडुन तिन दिवसा पोलीस कस्टडी रिमांड मिळाला असुन इतर आरोपी फरार असुन आरोपीतांचा शोध घेणे सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पोलीस हेड कॉन्स्टेबल विरेद्र काबंळे, संजय पंचभाई,, अनिल वैदय, पो.अमं.निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विरेद्र कांबळे हे करीत आहे.



