ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक कार्यालयात महामानवास विनम्र अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक महोदयांनी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.

यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महामानवाच्या विचारांचे स्मरण करत आदरांजली वाहिली. आपल्या संबोधानात पोलीस अधीक्षक म्हणाले की, “महामानवांचे विचार हे समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांनी दिलेल्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या मूल्यांचे जतन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण.

या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साही वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये