जि. प. उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे तालुकास्तरीय ‘सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, या मुख्य उद्देशाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथे तालुकास्तरीय ‘सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम २०२६-२७’ अंतर्गत विविध स्पर्धांचे नुकतेच शानदार आयोजन करण्यात आले होते.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या प्रेरणेतून आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. सोनवणे मॅडम यांच्या सूचनेनुसार या तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. या महत्वपूर्ण *कार्यक्रमाचे उद्घाटन* कोरपणा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कल्याणजी जोगदंड यांच्या हस्ते संपन्न झाले. तर *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी* केंद्र प्रमुख मा. विलास देवाळकर हे उपस्थित होते.
याप्रसंगी *प्रमुख अतिथी* म्हणून नांदगाव बीटाचे विस्तार अधिकारी सुनील कोहपरे अण्णा रावजी आडे रोहिदासजी राठोड , पंढरीनाथ मुसळे , केंद्रप्रमुख यांची विशेष उपस्थिती होती.
गटशिक्षणाधिकारी जोगदंड यांच्या उपस्थितीत या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांसाठी *परीक्षक* म्हणून श्री रोगे सर ,श्री बुच्चे सर,श्री असकर सर,श्री खंडाळकर सर, श्री निबरड सर यांनी काम पाहिले.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे अचूक मूल्यमापन करून स्पर्धा क्रमांकानुसार विजेत्या विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे निवड केली.*सर्व स्पर्धातील प्रथम,द्वितीय,तृतीय स्पर्धकांची निवड करून बक्षीस रोख रकमेत वितरित करण्यात आले
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद क्षीरसागर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला.
सदरच्या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळा सहभागी होत्या.



