पांझुर्णी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वरोरा तालुक्यातील पांझुर्णी येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती साजरी करण्यात आली ,ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,बुद्ध विहार समाज पांझुर्णी येथे साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापक, अम्रुतजी गेडाम,सामाजिक कार्यकर्ते, व माजी विद्यार्थी सदस्य सल्लागार, मारोतराव गुडेकर, शाळा समिती व्यवस्थापक अध्यक्ष सौ. मथुराताई संजयभाऊ चांभारे ,माजी विद्यार्थी संघ सदस्य सिध्दार्थ लोखंडे , भाग्यश्री कावटी,सुमनताई बेलखुडे,कुमारी काजल येडे ,ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत हनुमंते ,अक्षयकुमार बेलखुडे ,जांभुळे, राजु सावजी ईतर गावातील नागरीक उपस्थित होते,भाषण, गायन, कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वांनी डाॅ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालुन विनम्र अभिवादन केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना पांझुर्णी गावातील नागरिकाना हार्दिक शुभेच्छा दिल्या. शेवटी महाप्रसाद घेऊन कार्यक्रम संपला. आभार प्रदर्शन भाग्यश्री कावटी यांनी केले.



