डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती तहसील कार्यालय वर्धा येथे साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला संदिप पुंडेकर यांनी माला अर्पण करून अभिवादन केले
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी 14 एप्रिल 2026 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला 135 वर्षे पूर्ण झाले असून या निमित्ताने तहसील कार्यालय वर्धा येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार संदीप पुंडेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर अप्पर तहसीलदार प्रफुल्ल चौधरी यांनी अभिवादन केले यानंतर नायब तहसीलदार संदीप डाबेराव यांनी व नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांनी सुद्धा अभिवादन केले असून यानंतर तहसील कार्यालय येथील सर्व कर्मचारी यांनी अभिवादन केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील नितीन मेश्राम रंजना तडस अनंता राऊत रेणुका रासपायले संजय मळवर साहिल मेंढे उपस्थित होते.



