त्या सार्वजनिक रस्त्यावर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा अनाधिकृत कब्जा,तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
राजुरा कोरपणा जिवती या तालुक्यातील अनेक गावाशी व तालुक्याची जोडणारा स्वतंत्र पूर्व काळातील निस्तार पत्रकानुसार मोजा नोकारी कुसुंबी लिगनडोह आसापूर जिवती रस्ता असताना १९४७ – ५३निजाम कालीन नकाशा मध्ये सुद्धा व फसली नकाशा मध्ये सुद्धा याची नोंद आहे मात्र अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माणिकगड युनिटने निस्तार आहे.
पत्रकानुसार शासकीय दप्तरामध्ये व महसूल अभिलेखांमध्ये नोंदी असताना माणिकगड सिमेंट कंपनीने त्या ठिकाणी हा खाजगी रस्ता आहे प्रवेश प्रतिबंध असा फलक लावून आठ ते दहा गावाच्या लोकांना वाहतूक साठी अडथळा निर्माण केला आहे याबाबत अनेक वेळा वादविवाद निर्माण झाले रस्त्याच्या दोन्ही बाजूने चुनखडी खदानी व ब्लास्टिंग होत असल्याने अनेक वेळा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो याबाबत तहसीलदार राजुरा यांच्याकडे 19 20 मध्ये प्रकरण पंजीबद्ध करण्यात आले महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 161 व 165 अन्वये तहसीलदार राजुरा यांनी आदेश पारित करून दिनांक सात सात 2020 ला सदर जमीन रस्ता मायनिंग लि ज करार एग्रीमेंट मध्ये 17/8/1981 च्या लीजकरारात रस्ता कंपनीच्या ताब्यात दिलेला नाही तसेच पार्ट ३ मध्ये पब्लिक रोड अशी नोंद आहे असे असताना कंपनी नियमबाह्य मुजरीने गेट बांधून लोकांना अडवणूक करीत असल्याचे आदेशामध्ये नमूद आहेतसेच कंपनीकडून सुरक्षा रक्षक व लोखंडी गेट बसवून अडवणूक होत असल्याने तसेच रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर असताना कंपनीने नियमबाह्य आमच्या क्षेत्रात येते म्हणून बांधकाम रस्त्याचे काम अडवण्यात आले सदर बाप गंभीर असल्याने तहसीलदार होळी यांनी लीज करारातील मुद्दा क्र ५अन्वय भाडेपट्टेधारकाला सार्वजनिक रस्त्यावर काम करता येत नसल्याचे नमूद असल्यामुळे कंपनीने रस्त्यावरील अवैध बांधकाम प्रवेशद्वार काढून घ्यावे व रस्त्यावरील जाण्या येणाऱ्यांना अडवणूक करण्यात येऊ नये कंपनीने आपल्या बाह्य भागातील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना स्वतः करून घ्यावी मात्र मुख्य रस्त्यावर द्वार गेट बसवून अडवणूक करू नये व सदर आदेशापासून तातडीने रस्ता खुला करून द्यावा असा आदेश दिनांक सात सात दोन हजार वीस ला पारित करून कंपनी व मंडळ अधिकारी यांना निर्देश दिले.
मात्र गेल्या ५ वर्षात कंपनीने शासनाची कोणती मंजुरी नसताना अनाधिकृत पुन्हा बांधकाम करून लोकांना अडवणूक करीत आहे ही बाब गंभीर असून त्या परिसरातील शेतकऱ्यांना नागरिकांना जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे आठ दिवसाच्या आत हा रस्ता तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे खुला करण्यात यावा अन्यथा या पंचक्रोशीतील नागरिकामार्फत बनवण्यात आलेले व कंपनीच्या मनमर्जीने बांधण्यात आलेले द्वार गेट खुले करण्यात येईल व होणाऱ्या परिणामाला कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील असा निर्धार या परिसरातील गावकऱ्यांनी केला असून प्रशासनाने तहसीलदाराच्या आदेशाची अंमलबजावणी करून तातडीने अटॅक सिमेंट कंपनीच्या माणिकगड माईन्स क्षेत्रातील संपूर्णदरवाजे खुले करण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.



