लहुजी ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले जयंती व गुणवंतांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त कॅडर कॅम्प व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन लहुजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.अंकुश गोतावळे संस्थापक लहुजी ब्रिगेड हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंढरी गायकवाड तर उदघाटक मारुती मोरे व प्रमुख पाहुणे दत्ता तोगरे,देविदास कांबळे हे होते. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावागावातून युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सौं जयश्री गोतावळे नगरसेविका तसेच सौं अनिता गोतावळे माजी पं स सदस्य या विशेष करून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात मातंग समाजाची संस्कृती व जीवनपद्धती तसेच महात्मा फुले यांचे मातंग समाजासाठीचे अमूल्य योगदान, अनुसूचित जाती व उप वर्गीकरणासाठी नेमलेल्या अग्रवाल समितीला निवेदन सादर करण्याबाबतचे मार्गदर्शन, व तालुक्यातुन पोलीस भरती मध्ये निवड झालेल्या अजित कांबळे व कु आईशा पठाण या विद्यार्थ्यांचे लहुजी ब्रिगेड च्या वतीने सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन पहिल्या सत्रात अंबादास कंचकटले यांनी केले तर दुसऱ्या सत्रात योगेश पट्टेवाले यांनी केले कार्यक्रमाचे आभार देविदास कांबळे यांनी मानले.



