ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिन “जनसेवा दिन सप्ताह” अंतर्गत आपतग्रस्तांना तात्काळ मदत

भद्रावती तालुक्यातील वाघेडा येथील दोन घटनेत तात्काळ आर्थिक मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री यांचा वाढदिवस वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात “जनसेवा दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात येत असून संपूर्ण सप्ताह सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज जनसेवा दिन सप्ताहाचा तिसरा दिवस. याप्रसंगी आपतग्रस्तांना मदत, पक्षप्रवेश असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

भद्रावती तालुक्यातील वाघेडा येथील मनोज टोंगे यांचे कोठयाला आज रात्रो एक वाजताच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोणतीही मनुष्य व प्राणी जिवित हानी झालेली नाही. गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने सुमारे चार तासात आग विझविण्यात आली. तसेच गोठयातील बैलजोडी सुखरुप वाचविण्यात यश आले. वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख यांना ही घटना कळताच रात्रो वाघेडा येथे आपतकालीन मदत पोहचविण्यात आली.

आज वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वाघेडा येथे मनोज टोंगे यांची स्वता वैयक्तीक भेट घेतली. व वास्तविक परिस्थिती जाणून घेतली व तात्काळ मदत केली. या वेळी हनुमान टाले, मनोज कसारे, राकेश बोथले बंडु काकडे, प्रफुल थेरे, मंगेश भोयर व गावकरी मडळी घटनास्थळी उपस्थित होते सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, माजी सभापती वासुदेव ठाकरे, मिथुन खोब्रागडे, अक्षय बंडावार यांच्यासोबत घटनास्थळी यांनी भेट दिली.

वाघेडा येथील ग्रामस्थ सुरेश महादेव वराटे व देवराव गणपत टाले यांचे बैल सर्पदंशाने व विद्युत करंटने मृत्युमुखी पडले. यांना सुध्दा तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये